सबिना पार्क, किंग्स्टन येथे वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने पहिल्या डावात सर्वबाद 416 धावा केल्या आहेत. यामध्ये हनुमा विहारीने शतकी खेळी केली आहे.
विहारीने 225 चेंडूत 111 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 16 चौकार मारले. विहारीचे हे कसोटी कारकिर्दीतील पहिलेच शतक आहे. याबरोबरच तो सबिना पार्क स्टेडीयमवर शतक करणारा 9 वा भारतीय ठरला आहे.
सबिना पार्कवर भारताकडून सर्वप्रथम पॉली उम्रीगर यांनी 1953 मध्ये पहिले कसोटी शतक केले होते. त्यानंतर पंकज रॉय आणि विजय मांजरेकर यांनीही 1953 मध्येच येथे शतक केले. पण त्यानंतर जवळजवळ 18 वर्षांनंतर दिलीप सरदेशाई यांनी 1971 मध्ये 212 धावांची द्विशतकी खेळी केली.
यानंतर नवज्योत सिंग सिद्धू, राहुल द्रविड, केएल राहुल आणि अजिंक्य रहाणे यांनी ही कामगिरी केली.
सध्या किंग्स्टन येथे सुरु असलेल्या वेस्ट इंडीज विरुद्ध भारत सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर वेस्ट इंडीजने पहिल्या डावात 7 बाद 87 धावा केल्या आहेत. भारताकडून या डावात जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या आहेत. तर मोहम्मद शमीने 1 विकेट घेतली.
सबिना पार्कवर कसोटी शतक करणारे भारतीय क्रिकेटपटू –
212 – दिलीप दिलीपसरदेसाई (1971)
158 – केएल राहुल (2016)
150 – पंकज रॉय (1953)
118 – विजय मांजरेकर (1953)
117 – पॉली उम्रीगर (1953)
116 नवज्योत सिंग सिद्धू (1989)
112 – राहुल द्रविड (2011)
111- हनुमा विहारी (2019)
108 – अजिंक्य रहाणे (2016)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–१३ वर्षांनंतर जसप्रीत बुमराहने केला तो खास कारनामा, झाला या खास यादीत समावेश
–इंग्लंडचा स्टार ऑलराउंडर बेन स्टोक्स झाला या फुटबॉल क्लबचा अधिकृत फॅन
–१४० किलो वजनाच्या राहकिम कॉर्नवॉल पुजाराची विकेट घेतल्यानंतर म्हणाला…






