दिलीप ट्रॉफी 2023 साठी दक्षिण विभागाचा संघ जाहीर करण्यात आला. हनुमा विहारीला या संघाचे कर्णधारपद देण्यात आले असून मयंक अग्रवालकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. हनुमा विहारी आणि मयंक अग्रवाल हे दोघेही सध्या भारतीय कसोटी संघामधून बाहेर आहेत. याशिवाय, टिळक वर्माचा देखील दक्षिण विभागीय संघामध्ये समावेश करण्यात आला. ज्यांनी इंडियन प्रीमिअर लीग 2023 मध्ये आपल्या फलंदाजीने खूप चर्चा केली.
हनुमा विहारी करणार संघाचे मार्गदर्शन
हनुमा विहारी (Hanuma Vihari) भारतीय संघातून (Indian Team) बऱ्याच दिवसांपासून बाहेर आहे. त्याने आपला शेवटचा कसोटी सामना जुलै 2022 मध्ये इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर येथे खेळला होता. तसेच, विहारीने आतापर्यंत 28 कसोटी डावांमध्ये 33.56 च्या सरासरीने 839 धावा केल्या आहेत. तर, विहारीने 2021 साली बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट खेळी करून भारतीय संघाचा सामना अनिर्णित ठेवला होता. मात्र, त्यानंतर तो बराच काळ खेळापासून बाहेर राहिला.
आता विहारीला आपली योग्यता सिद्ध करण्याची आणखी एक मोठी संधी मिळाली. त्याला दक्षिण विभागीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले. तसेच, या संघामध्ये वॉशिंग्टन सुंदर, साई सुदर्शन आणि साई किशोर सारखे खेळाडूही असणार आहेत. याशिवाय केएस भरत या संघाचा यष्टिरक्षक असेल, तर, तो अलीकडेच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारतीय संघासाठी खेळला होता.
दिलीप ट्रॉफीचा (Duleep Trophy) आगामी हंगाम 28 जूनपासून सुरू होणार आहे. यावेळी हा हंगाम 28 जून ते 16 जुलै दरम्यान खेळवला जाईल. तसेच, पूर्ण वेळापत्रक आणि स्थळ अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र, बीसीसीआय लवकरच याबाबत घोषणा करू शकते.
दुलीप ट्रॉफीसाठी संपूर्ण दक्षिण विभागाचा संघ येथे आहेहनुमा विहारी (कर्णधार), मयंक अग्रवाल (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), रिकी भुई (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, वॉशिंग्टन सुंदर, आर समर्थ, टिळक वर्मा, सचिन बेबी, साई किशोर, व्ही कावेरप्पा , विजयकुमार व्यासक, प्रदोष रंजन पॉल, शशिकांत केव्ही आणि दर्शन मिसाळ.
महत्वाच्या बातम्या –
ICC Test Rankings: ऑस्ट्रेलियन संघाने केली इतिहासाची पुनरावृत्ती; 39 वर्षांनंतर घडला ‘हा’ योगायोग
मस्तच! 5 चेंडूत 5 षटकार ठोकत अलिशान शराफूची रिंकू सिंगला टक्कर, तुम्ही पाहिला का व्हिडीओ?