भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा आज 51वा वाढदिवस. जगातल्या आक्रमक कर्णधारपैकी गांगुली हा एक होता. खऱ्या अर्थाने भारतीय संघाला परदेशात जिंकण्याचा विश्वास निर्माण केला तो याच अवलीयाने. 2002 सालची इंग्लंड विरुध्द नटवेस्ट सिरीज जिंकल्यानंतर गांगुलीने ज्या पद्धतीने शर्ट काडून विजय साजरा केला होता तो क्षण आजही करोडो चाहत्यांच्या स्मरणात आहे. गांगुलीला निवृत्त होऊन आता 15 वर्ष उलटत आलीत पण आजही गांगुली भारतीय क्रिकेटशी या ना त्या कारणाने जोडलेला आहे.
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने भारताकडून 100 पेक्षा जास्त कसोटी सामने खेळले आहेत. भारताकडून 100 पेक्षा जास्त कसोटी सामने खेळणारा गांगुली हा आठवा भारतीय खेळाडू आहे. गांगुली भारताकडून ३०० पेक्षा अधिक एकदिवसीय सामने खेळलेला चौथा खेळाडू आहे .भारताच्या क्रिकेट इतिहासात एकदिवसीय सामन्यात सचिननंतर सर्वाधिक धावा गांगुलीच्या नावावर आहेत. त्याने ११३ कसोटी सामन्यात 15शतके आणि 311 एकदिवसीय सामन्यांतली 22 शतके ठोकली आहेत. एकदिवसीय सामन्यांत 10000 धावा काढणारा गांगुली जगातील सातवा तर भारतातला दुसरा फलंदाज आहे.
गांगुलीने 2000-2005 सालांदरम्यान 49 कसोटी सामन्यांत भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळले होते. 49 सामन्यामधून 21 सामन्यांत भारताला गांगुलीने आपल्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीत विजय मिळवुन दिलेत. 2003 च्या क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघाची धुरा हा गांगुलीच्या हाती होता. या विश्वचषकात भारतीय संघाने अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती. अशा या दादा खेळाडूला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
संबंधित बातम्या-
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला
क्रिकेटची खेळपट्टी ते भलीमोठी जिम; ‘कोलकाताच्या प्रिंस’चा 48 खोल्यांचा 65 वर्षे जुना राजमहाल पाहिलाय का?