भारतीय संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू रॉजर बिन्नी बुधवारी (दि.19 जुलै) आपला 68वा वाढदिवस साजरा करत आहेत. भारताचे पहिले इंग्लो- इंडियन क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांचा जन्म 19 जुलै, 1955रोजी बेंगलोरमध्ये झाला होता. भारतीय संघाने 1983 विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवला होता. या विजयात रॉजर बिन्नी यांनी देखील मोलाचे योगदान दिले होते. त्यांनी या स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. तसेच त्यांनी भारतीय 19 वर्षाखालील संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली आहे. 2000 साली जेव्हा भारतीय संघाने 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवला होता. त्यावेळी रॉजर बिन्नी हे भारतीय संघाचे प्रशिक्षक होते.
विश्वचषक 1983 स्पर्धेचे दुर्लक्षित नायक
जेव्हा जेव्हा 1983 विश्वचषक स्पर्धेचा उल्लेख केला जातो. तेव्हा कपिल देव (Kapil Dev) यांच्या 175 धावांची खेळी, मदनलाल यांची उत्कृष्ट गोलंदाजी आणि अमरनाथ यांची अष्टपैलू कामगिरी यांचा नेहमी उल्लेख केला जातो. परंतु, रॉजर बिन्नी यांनी या स्पर्धेत सर्वाधिक 18 गडी बाद केले होते. त्यांनी 8 सामन्यात एकूण 88 षटके गोलंदाजी केली होती. यामध्ये त्यांनी 336 धावा खर्च करत 18 गडी बाद केले होते. यामध्ये 29 धावा खर्च करत 4 गडी बाद, ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती. रॉजर बिन्नी यांनी वेस्ट इंडिज संघाचे कर्णधार क्लाइव लॉयड यांना 2 वेळेस बाद केले होते.( Happy Birthday roger binny, he was the coach of the Indian team that won icc under 19 world cup)
निवृत्तीनंतर घेतला प्रशिक्षक होण्याचा निर्णय
रॉजर बिन्नी यांनी भारतीय 19 वर्षाखालील संघाला प्रशिक्षण दिले आहे. भारतीय क्रिकेटला मोलाचे योगदान देणारे मोहम्मद कैफ आणि युवराज सिंग यांना रॉजर बिन्नी यांनी प्रशिक्षण दिले होते. 2000 साली झालेल्या 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने बाजी मारली होती. मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या भारतीय संघाने कोलंबोमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंका संघाला 6 गडी राखून पराभूत केले होते. या स्पर्धेत युवराज सिंगला ‘मालिकावीर’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
रॉजर बिन्नी यांची कारकीर्द
रॉजर बिन्नी यांनी आपल्या कारकीर्दीत एकूण 27 कसोटी सामने खेळले. ज्यामध्ये त्यांनी 23.1 च्या सरासरीने 830 धावा केल्या होत्या. यामध्ये 5 अर्धशतकांचा समावेश होता. तसेच त्यांनी गोलंदाजी करताना 47 गडी देखील बाद केले आहेत. यासोबतच 72 वनडे सामन्यात त्यांनी 16.1 च्या सरासरीने 629 धावा केल्या आहेत. तसेच वनडे क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना त्यांनी 77 गडी बाद केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
फ्लॉवर यांच्या कोचिंगची जादू कायम! लखनऊने नारळ दिल्यानंतर ‘या’ आयपीएल संघाकडून ऑफर
मॅंचेस्टरमध्ये ऑस्ट्रेलिया करणार ऍशेस सील? चौथ्या कसोटीत कांगारूंनी उतरवला तगडा संघ