नेदरलँड महान क्रिकेटपटू रायन टेन दोस्काटेचा वाढदिवस. आयसीसीच्या पूर्णवेळ सदस्य नसलेल्या देशातील एक परिपूर्ण असा खेळाडू. आयसीसी असोसिएट प्लेयर ऑफ द इयरने तीन वेळा सन्मानित. अशा या खेळाडूबद्दल
३० जुन १९८० ला जन्म
दक्षिण आफ्रिकेत जन्म, वेस्टर्न प्रोव्हिन्स कडून क्रिकेट खेळायला सुरुवात
ग्रॅहम गूच कडून एसेक्स साठी खेळायला निमंत्रण
२००३ मध्ये इंग्लिश काउंटी एसेक्स सोबत करारबद्ध
२००६ मध्ये नेदरलँड्स तर्फे एक दिवसीय सामन्यात पदार्पण. श्रीलंकेचा ४४३ धावांचा विक्रमी डोंगर, दोस्काटेच्या ३७ धावा आणि २ बळी
२००७ विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५७ आणि स्कॉटलंड विरुद्ध विजयी ७०* धावांची खेळी.
२००८ ला ICC असोसिएट प्लेअर ऑफ थे इयर ने सन्मानित
२००९ ला T२० विश्वचषकात इंग्लंड विरुद्ध विजयी भागीदारी, २२*(१७) नाबाद राहून १६२ धावाचा पाठलाग
२०१०,२०११ ला ICC असोसिएट प्लेअर ऑफ थे इयर ने सन्मानित
२०११ ला IPL मध्ये खेळणारा पहिला असोसिएट खेळाडू
२०११ च्या विश्वचषकात इंग्लंड विरुद्ध ११९* धावांची अप्रतिम खेळी
आयर्लंड विरुद्ध १०६ धावांची शतक, विश्वचषकातले दुसरे शतक, आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामन्यात शेवटची खेळी.
यानंतर जवळ पास ८ देशात १३ संघाचे प्रतिनिधित्व (अडेलैड स्ट्राईकर्स, एसेक्स, ढाका डायनॅमिट्स, चित्तगॉन्ग किंग्स, कराची किंग्स, मशोनलॅंड्स, कोलकाता नाईट रायडर्स, केंटरबुरी, ओटॅगो, इम्पी, टास्मानिया व इतर)
नेदरलँड्स तर्फे सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतके व २रे सर्वोच्च एकूण बळी.
६७.०० – एक दिवसीय सामन्यातील सरासरी.आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामन्यातील सर्वोच्च, ५ पेक्षा अधिक खेळींमध्ये.
सामने ३३, धावा १५४१, नाबाद ९, सरासरी ६७.००, शतके ५, अर्धशतके ९, सर्वोच्च ११९*, बळी ५५, सर्वोच्च ४/३१