केपटाऊन| दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (SA vs IND) यांच्यात मंगळवारपासून (११ जानेवारी) न्यूलँड्स येथे कसोटी मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना (Third Test) सुरू झाला आहे. मालिका जिंकण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. हा सामना जिंकत १-१ ने बरोबरीत असलेली मालिकाही खिशात घालण्याची उभय संघांकडे संधी असणार आहे. हा सामना भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्यासाठी खूप खास असणार आहे. कारण या सामन्याची सुरुवात त्याच्या मुलीच्या अर्थात वामिका कोहली (Vamika Kohli) हिच्या वाढदिवसा दिवशी (Vamika Kohli Birthday) होते आहे.
जानेवारी ११, २०२१ रोजी जन्मलेल्या वामिकाला आज १ वर्ष पूर्ण झाले आहे. तिच्या जन्मानंतर वडिल विराटच्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल झाले आहेत. वामिका विराटसाठी लकी चार्म सिद्ध होते आहे. तिच्या जन्मानंतर विराटने बरेचसे किर्तीमान केले आहेत. केवळ विराटसाठीच नव्हे तर भारतीय क्रिकेट संघासाठीही वामिका भाग्यशाली (Vamika Lucky For Team India) राहिली आहे. विशेष म्हणजे, तिच्या जन्माचे भारतीय संघाच्या विजयाशी खास नाते (Vamika And Team India Win Connection) आहे. याचबद्दल आपण इथे जाणून घेणार आहोत.
व्हिडिओ पाहा-
वामिकाचा जन्म गतवर्षी जानेवारी महिन्यातील ११ तारखेला झाला होता. तेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (India Tour Of Australia 2021) होता. या दौऱ्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍडलेड येथे झालेला पहिला कसोटी सामना गमावला होत. मात्र त्यानंतर मेलबर्न येथील दुसरा कसोटी सामना जिंकत मालिकेत धमाकेदार पुनरागमन केले होते. मात्र या दोन्ही सामन्यातही विराट अनुपस्थित होता. तो वामिकाचा जन्म होणार असल्याने भारतात गेला होता.
त्यानंतर सिडनी येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये तिसरा कसोटी सामना झाला होता. या सामन्याचा निकाल ११ जानेवारी रोजी म्हणजेच वामिकाच्या जन्मदिना दिवशी आला होता. भारताने हा सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले होते. यासह भारताच्या ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याच्या अपेक्षा जिवंत झाल्या होत्या.
वामिकाचे भारतीय संघाच्या विजयाशी कनेक्शन
वामिकाच्या जन्माच्या ४ दिवसांनंतर अर्थात १५ जानेवारीपासून ब्रिसबेन येथे चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सुरू झाला होता. हा सामना जिंकत भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कसोटी मालिका विजयाची नोंद केली होती. एकूणच वामिकाचे येणे भारतीय संघासाठी एकप्रकारे शुभ राहिले, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. तेव्हा भारताने ऑस्ट्रेलियात ३ वर्षांच्या आत सलग दुसरी कसोटी मालिका जिंकली होती.
हेही वाचा- लहानग्या वामिकाने पहिल्यांदाच अनुष्काला म्हटले ‘मम्मा’; तिचा आवाज ऐकून म्हणाल, ‘किती गोड’!
सेंच्यूरियनमधील विजयाची साक्षीदार बनली होती वामिका
यानंतर डिसेंबर २०२१ मध्ये सेंच्यूरियन येथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना झाला होता. ११३ धावांनी हा सामना जिंकत भारताने इतिहास रचला होता. हा भारतीय संघाचा सेंच्यूरियनवरील २९ वर्षांनंतरचा पहिलाच कसोटी विजय होता. विशेष म्हणजे भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली हा सामना जिंकला होता आणि वामिका हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होती.
महत्त्वाच्या बातम्या-
तिसरी कसोटीः कर्णधार विराट संघात परतला, ‘या’ दोन खेळाडूंचा झाला पत्ता कट
बिग ब्रेकिंग! दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज गोलंदाज ख्रिस मॉरिस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
हेही पाहा-