दक्षिण आफ्रिका संघाचा दिग्गज अष्टपैलू ख्रिस मॉरिस याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली. आहे. 34 वर्षीय ख्रिस मॉरिसने गेली अनेक वर्षे दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीची आणि तळातील फलंदाजीची धूरा स्वतःच्या खांद्यावर वाहिली होती. (Chris Morris announce Retirement from all forms of cricket)
मॉरिसने इंस्टाग्राम पोस्टवर निवृत्तीची घोषणा करताना लिहिले आहे की, ‘मी सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत आहे. माझ्या प्रवासात ज्यांनी ज्यांनी छोटे-मोठे योगदान दिले, त्या सर्वांना धन्यवाद. हा खूप मजेदार प्रवास होता.’ याबरोबरत मॉरिसने ही देखील माहिती दिली की तो यापुढे दक्षिण आफ्रिकेतील फ्रँचायझी संघ ‘टायटन्स’साठी प्रशिक्षक म्हणून काम करेल.
मॉरिसने २०१९ वनडे विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचे अखेरचे प्रतिनिधित्त्व केले होते. त्या स्पर्धेत तो दक्षिण आफ्रिकेचा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता. २०१२ साली आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या मॉरिसने ४ कसोटी, ४२ वनडे आणि २३ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९४ विकेट्स घेतल्या असून ७७३ धावा केल्या आहेत.
याशिवाय मॉरिसनने त्याच्या कारकिर्दीत एकूण ६० प्रथम श्रेणी सामन्यात १९६ विकेट्स आणि २५७१ धावा केल्या आहेत. तसेच १०५ अ दर्जाच्या सामन्यांमध्ये १२६ विकेट्स आणि १३५९ धावा केल्या आहेत. त्याची कामगिरी सर्वाधिक बहरली ती टी२० क्रिकेटमध्ये त्याने या प्रकारात एकूण २३४ सामने खेळले असून २९० विकेट्स घेतल्या आहेत आणि १८६८ धावा केल्या आहेत.
आयपीएलमधील महागडा खेळाडू
मॉरिस हा आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महगडा ठरलेला खेळाडू आहे. त्याला आयपीएल २०२१ च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने १६.२५ कोटी रुपयांची बोली लावत खरेदी केले होते. त्याने आयपीएलमध्ये ८१ सामने खेळले असून ९५ विकेट्स घेतल्या आहेत आणि ६१८ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
“जग जसं पाहतं तसं मी स्वतःकडे कधीच पाहत नाही”, विराट कोहलीचे टीकाकारांना चोख प्रत्युत्तर