दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक कसोटी सामना केपटाऊनच्या (Capetown) मैदानावर पार पडणार आहे. हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण हा सामना जिंकून भारतीय संघाला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार विराट कोहली याचा (Virat Kohli) एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या मालिकेतील अंतिम कसोटी सामना मंगळवार (११ जानेवारी ) पासून केपटाऊनमध्ये पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार विराट कोहली नेट्समध्ये जोरदार सराव करताना दिसून आला आहे. ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयने (BCCI) आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो मैदानाच्या चारही बाजूंना शॉट खेळताना दिसून येत आहे. तो पुल शॉट, कव्हर ड्राईव्ह आणि कट शॉट खेळताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ पाहून तो चांगल्याच फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत आहे.
भारतीय संघाला जर या सामन्यात विजय मिळवायचा असेल, तर विराट कोहलीला देखील चांगली कामगिरी करावी लागणार आहे. गेल्या २ वर्षांपासून त्याला शतक झळकावण्यात अपयश येत आहे. तसेच या मालिकेत देखील त्याला साजेशी कामगिरी करता आली नाहीये. सेंच्युरियनमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याला ३५ आणि १८ धावांची खेळी करण्यात यश आले होते.
???? ???? ????
Practice ????
???????? ???????????? ???????????????? – ???????????????????????????? ????????????????????.???? ????#TeamIndia | #SAvIND | @imVkohli pic.twitter.com/ChFOPzTT6q
— BCCI (@BCCI) January 10, 2022
या कामगिरीनंतर अनेकांनी त्याच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. दरम्यान त्याने देखील टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्याने पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, “माझ्या फॉर्मबद्दल लोकांनी बोलण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. माझ्या कारकिर्दीत असे अनेकदा घडले आहे. जेव्हा २९१४ मध्ये मी इंग्लंड दौऱ्यावर गेलो होतो त्यावेळी देखील असा प्रकार घडला होता. जग मला जसं पाहतं तसं मी स्वतःकडे कधीच पाहत नाही. मी फक्त संघासाठी माझे सर्वोत्तम कार्य करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे आणि संघासाठी जे काही करता येईल ते करेन.”
विराटसाठी हा कसोटी सामना आणखी एका गोष्टीसाठी खास असणार आहे. मंगळवारी त्याची लेक वामिकाचा पहिला वाढदिवस आहे.
महत्वाच्या बातम्या :
U19 विश्वचषक चार दिवसांवर येऊन ठेपलाय आणि अफगाणिस्तान संघ अजून पोहोचलाच नाही; गंभीर आहे कारण
महानतेवर शिक्कामोर्तब! रॉस टेलरला अखेरच्या कसोटीत मिळाला ‘गार्ड ऑफ ऑनर’; पाहा भावनिक व्हिडिओ
हे नक्की पाहा :






