मागील काही महिने क्रीडा क्षेत्र कोरोना व्हायरसमुळे ठप्प पडले होते. पण आता हळुहळू क्रीडा स्पर्धा सुरळीत सुरु होत असून यात क्रिकेट सामन्यांचाही समावेश आहे. मागील ३ महिन्यात कोरोनाच्या विळख्यातही अनेक क्रिकेट सामने यशस्वीरित्या पार पडले. असे असतानाच आता येता आठवडा क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.
येत्या आठवड्यात ३ आंतरराष्ट्रीय मालिकांना सुरुवात होत आहे. यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील वनडे मालिकेचाही समावेश आहे. तसेच लंका प्रीमीयर लीग या स्पर्धेलाही सुरुवात होत आहे.
लंका प्रीमीयर लीगला २६ नोव्हेंबरपासून सुरुवात
यंदा लंका प्रीमीयर लीगचा पहिला हंगाम खेळवला जाणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना कोलंबो किंग्ज विरुद्ध कँडी टस्कर्स यांच्यात २६ नोव्हेंबरला होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० ला सुरुवात होणार आहे.
२७ नोव्हेंबरला ३ आंतरराष्ट्रीय सामने –
२७ नोव्हेंबर या दिवशी क्रिकेटप्रेमींना एक-दोन नाही तर तीन आंतरराष्ट्रीय सामने पहायला मिळणार आहेत. २७ नोव्हेंबरपासून न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी२० मालिकांना सुरुवात होणार आहे. तर भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यालाही याच दिवशी सुरुवात होत आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात या दिवशी वनडे मालिकेतील पहिला सामना होणार आहे.
म्हणजे २७ नोव्हेंबरला तब्बल ६ आंतरराष्ट्रीय संघ सामने खेळणार आहेत. या ६ संघात मिळून एकाच दिवशी ३ सामने चाहत्यांना पाहायला मिळतील. न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील टी२० सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११.३० वाजता सुरु होणार आहे. तर दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला टी२० सामना रात्री ९.३० वाजता सुरु होणार आहे. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील वनडे सामन्याला सकाळी ९.१० ला सुरुवात होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
जेव्हा विराटने ‘त्या’ खेळाडूला व्हॉट्सऍपवरुन पाठवले होते १५ डॉलरचे वाऊचर
विराटचा संघ पडला केएल राहुलच्या संघावर भारी; टीम इंडियाच्या खेळाडूंमध्येच रंगला सामना, पाहा फोटो
आयपीएलमध्ये झिरो ठरलेला ‘तो’ भारताविरुद्ध ‘हिरो’ ठरण्यासाठी घेतोय कसून मेहनत