नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. मागच्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये भारतीय संघाचे एकंदरीत प्रदर्शन चांगले राहिले. भारतीय संघ आणि संघातील खेळाडूंनी चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले. पण भारताला 2023 एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. असे असले तरी, यावर्षी आयसीसी टी-20 विश्वचषक खेळला जाणार आहे. भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यासाटी प्रबळ दावेदार आहे. माजी दिग्गज वसीम जाफर याने नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. पण या शुभेच्छांमधून भारतीय क्रिकेट संघाला चिमटा काढण्याचे काम त्याने केले.
भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज वसीम जाफर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. आपल्या मजेशीर पोस्ट आणि मिम्ससाठी जाफर खासकरून ओळखला जातो. भारतीय संघाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतानाही जाफरने असेच काहीसे केले आहे. 2023 वर्ष भारतासाठी अनेक अर्थाने खास ठरले. संघाकडे यश मिळवण्याच्या संधी होत्या. पण मोक्याच्या वेळी भारताला अपयशाचा सामना करावा लागला. तुलनेने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने मागचे वर्ष सार्थकी लावले. याच पार्श्वभूमीवर जाफरने नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना पॅट कमिन्सचा उल्लेख केला.
वसीम जाफरच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. जाफरची या व्हायरल पोस्टमध्ये त्याने लिहिले की, “सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तुमचे 2024 वर्ष पॅट कमिन्सच्या 2023 प्रमाणे यशस्वी जाओ.” कमिन्सच्या मजेशीर पोस्टवर नेटकऱ्यांच्या एकापेक्षा एक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, पॅट कमिन्स याने कर्णधाराच्या रुपात मागच्या एका वर्षात दोन आयसीसी ट्रॉफी जिंकला. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, आणि आयसीसी वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात कमिन्सच्या ऑस्ट्रेलियन संघाने भारताला मात दिली. ऍशेस 2023 मध्येही ऑस्ट्रेलियाने यजमान इंग्लंड संघाला विजय मिळू दिला नाही. आगामी आयपीएलसाठी डिसेंबर 2023 मध्ये खेळाडूंचा लिलाव पार पडला. यातही पॅट कमिन्सने मोठी मजल मारली. कमिन्स आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीने त्याला संघात घेण्यासाठी 20.50 कोटी रुपये खर्च केले. (Happy New Year from Wasim Jaffer)
महत्वाच्या बातम्या –
कारकिर्दीत ‘या’ तिघांनी लायनला सर्वात जास्त त्रास दिला! फिरकीपटूच्या यादीतील दोन नावे भारतीय
द पूना क्लब गोल्फ लीग । आकाश नखरे, आदित्य घाग, अविनाश देऊस्कर, जान्या बिष्णोई ठरले महागडे खेळाडू