---Advertisement---

भारतीय क्रीडापटूंनी अशा दिल्या देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा…

On: रविवार, जानेवारी 26, 2020 7:45 PM
---Advertisement---

आज संपूर्ण भारतात 71 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. करोडो लोक प्रजासत्ताक दिनानिमित्त एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. त्याप्रमाणे आज भारताच्या क्रीडापटूंनीही सोशल मीडियावरून देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), विरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) मोहम्मद शमी (Mohammad Shami),  सानिया मिर्झा (Sania Mirza), कुस्तीपटू सुशील कुमारचाही (Sushil Kumar) समावेश आहे.

भारतीय क्रीडापटूंनी प्रजासत्ताक दिनाच्या अशाप्रकारे दिल्या शुभेच्छा-

-मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये ट्वीट करत सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये त्याने लिहिले की, ‘तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद!’

-भारताचा विस्फोटक सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागने ट्वीट करत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना  एक कविता शेअर केली आहे.

-भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने ट्वीट करत लिहिले की, या प्रजासत्ताक दिनी भारताचा विजय आणि भारताच्या स्वातंत्र्यवीरांचा विजय असो. तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. जय हिंद!

-भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammad Shami) ट्विटरवरून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना लिहिले की, ‘अभिमान बाळगा की आपण भारतीय आहोत. कारण, जो या महान देशात जन्मला आहे तो भाग्यवान आहे. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.’

-भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने (Mohammad Kaif) भारत देश नेहमी समृद्ध राहावा असे म्हटले आहे. त्याचबरोबर या प्रजासत्ताक दिनी  ट्वीट करत लिहिले की, ‘हे विचारू नका की या देशाने तुमच्यासाठी काय केले. हा विचार की तुम्ही या देशासाठी काय काय करू शकता. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.’

-भारत विरुद्ध न्यूझीलंड आंतरराष्ट्रीय टी20 मालिकेत समालोचकाची भूमिका निभावत असणाऱ्या भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने न्यूझीलंडवरून ट्वीट केला आहे की, तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

-भारताचा कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराने प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत ट्विटरवरून तिरंग्याचा एक फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना या विशेष दिनी शुभेच्छा दिल्या आहेत.

-भारताचा कुस्तीपटू सुशील कुमारने (Sushil Kumar) सैनिकाबरोबर आपला फोटो शेअर करत लिहिले की, तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद!

-स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने (Sania Mirza) तिरंग्याबरोबर लिहिले की, तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---