---Advertisement---

पहिल्या आंतरराष्ट्रीय विकेटचा आनंद, कृष्णप्पा गौतमचा ‘तो’ व्हिडिओ झाला व्हायरल

On: शनिवार, जुलै 24, 2021 12:42 AM
---Advertisement---

श्रीलंका विरुद्ध भारत संघात शुक्रवारी (२३ जुलै) वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला गेला. यजमान श्रीलंकेने हा सामना जिंकून टी२० मालिकेपूर्वी आत्मविश्वास कमावला. भारतीय संघाने या सामन्यात पाच खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली होती. त्यापैकी अष्टपैलू कृष्णप्पा गौतम याला आपला पहिला आंतरराष्ट्रीय बळी मिळाला. त्यानंतर त्याने केलेल्या जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

भारतीय संघात सहा बदल
आधीच मालिका विजय साजरा केलेल्या भारतीय संघाने आजच्या सामन्यामध्ये भारतीय संघात सहा बदल केले गेले. यष्टीरक्षक संजू सॅमसन, फलंदाज नितीश राणा, लेगस्पिनर राहुल चाहर, अष्टपैलू कृष्णप्पा गौतम व डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन सकारिया यांनी वनडे पदार्पण केले. वेगवान गोलंदाज नवदीप सैनीदेखील ऑस्ट्रेलिया दौ-यानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय सामन्यात उतरला.

पहिल्याच षटकात गौतमने मिळवला बळी
पदार्पण करणाऱ्या पाच खेळाडूंपैकी एक असलेला कर्नाटकचा अष्टपैलू कृष्णप्पा गौतम याला फलंदाजीमध्ये अपयश आले. तो ३ चेंडूंमध्ये २ धावा काढून अकिला धनंजयाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर, गोलंदाजीसाठी त्याला सहाव्या षटकातच पाचारण करण्यात आले. त्याने पहिलाच चेंडू आखूड टप्प्याच्या टाकल्याने अविष्का फर्नांडोने चौकार खेचला. पुढील चेंडू त्याच्या हातून वाईड पडला व चौकारापर्यंत गेला. त्याच्या एकाच चेंडूत नऊ धावा दिल्या गेल्या होत्या. दुसऱ्याच चेंडूवर एक धाव निघाल्याने मिनोद भानुका स्ट्राइकवर आला. गौतमच्या तिसऱ्या चेंडूवर मिनोदने स्विपचा फटका खेळला. मात्र, त्याचा हा फटका सरळ चेतन सकारियाच्या हाती विसावला. त्याच्या या बळीचा व्हिडिओ सोशलमीडियावर व्हायरल होत आहे.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये केली उत्कृष्ट कामगिरी
कर्नाटकसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणारा गौतम आक्रमक फलंदाज व ऑफस्पिन गोलंदाज म्हणून ओळखला जातो. देशांतर्गत क्रिकेट तसेच आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्याला भारतीय संघात संधी देण्यात आली होती. तो भारताचा २३८ वा वनडे खेळाडू बनला.

महत्त्वाच्या बातम्या – 

मोठ्या मनाचा द्रविड! श्रीलंकन कर्णधाराला तिसऱ्या सामन्यात केले मार्गदर्शन, फोटो होतायेत व्हायरल

भारताने २१ व्या स्थानी केले ऑलिम्पिक उद्घाटनात संचलन; ‘या’ आगळ्यावेगळ्या नियमानुसार ठरते संचलनातील देशांची क्रमवारी

रहाणे, मंकड यांच्या पंक्तीत बसला सॅमसन; अर्धशतक हुकल्यानंतरही झाला ‘हा’ विक्रम नावावर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---