भारतीय संघाचा सर्वकालीन महान फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. आपल्या ट्विटर हँडलवरून त्याने एक पोस्ट शेअर करत. याबाबत माहिती दिली. हरभजनच्या निवृत्तीसह भारतीय क्रिकेटचा सुवर्णकाळ समजल्या जाणाऱ्या 1999 ते 2012 या काळातील सर्व खेळाडू निवृत्त झाले आहेत.
हरभजन सिंगने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीदरम्यान गोलंदाजीतून अनेक विक्रम केले आहेत. त्याचबरोबर क्रिकेटच्या प्रत्येक स्वरूपात त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. हरभजन सिंगने जेव्हा क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते तेव्हा त्याला या गोष्टी जराही अंदाज नव्हता की, तो इतक्या लांबपर्यंतचा क्रिकेट क्षेत्रात प्रवास करेल.
याच भज्जीला त्याच्या युवा वयात गोलंदाजी करताना फार कमी जणांनी पाहिले असेल. एकदा खुद्द हरभजनने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याचा युवा वयातील गोलंदाजीचा व्हिडिओ पोस्ट केला होता.
हरभजन सिंगने केला जुना व्हिडिओ पोस्ट
भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंगने इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला होता. हरभजन सिंगने पोस्ट केलेला हा व्हिडीओ 1998 मधला आहे. तेव्हा भारतीय संघाने 1998 साली मलेशिया येथे खेळल्या गेलेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत भाग घेतला होता. त्यावेळी हरभजन सिंग फक्त 18 वर्षांचा होता.
हेही वाचा- बिग ब्रेकिंग! भारतीय क्रिकेटच्या सुवर्ण काळाचा अखेरचा शिलेदार हरभजन सिंग निवृत्त
भावूक झाला हरभजन सिंग
हरभजन सिंगने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, त्याने अँटिग्वा आणि बारबुडा संघाचा फलंदाज सिल्वेस्टर जोसफला बाद केले होते. हा व्हिडिओ पोस्ट करत हरभजन सिंगने कॅप्शन लिहीले की, ‘जेव्हा राष्ट्रकूल स्पर्धेमध्ये क्रिकेट खेळले जात होते.’
https://www.instagram.com/p/CQ-aNVRBQFc/?utm_source=ig_web_button_share_sheet
अजय जडेजा होता कर्णधार
साल 1998 झालेल्या राष्ट्रीकूल स्पर्धेमध्ये अजय जडेजा भारतीय संघाचा कर्णधार होता. तर अनिल कुंबळेला उपकर्णधारपदी नियुक्त करण्यात आले होते. या स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर होता आणि इथूनच भारतीय संघाला या स्पर्धेतून बाहेर जावे लागले होते. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करून दक्षिण आफ्रिकेने सुवर्णपदक जिंकले होते.
हरभजन सिंगने आपल्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2016 मध्ये खेळला होता. त्यानंतर आता 2021 मध्ये त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये 2008 पासून ते 2017 पर्यंत मुंबई इंडियन्स संघाकडून खेळले होते. तर 2018 आणि 2019 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचे त्याने प्रतिनिधित्व करत होते. तर 2021 च्या आयपीएल हंगामात हरभजन सिंग कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळत होता.
महत्वाच्या बातम्या-
दीपक चाहरचा स्विंग पाहून चाहते चकित; म्हणाले, ‘हे फक्त आशिया खंडाच्या बाहेरच होऊ शकते’
एकवेळ वाटलेलं कधी कसोटी खेळायलाही मिळणार नाही, आता तोच बनलाय भारताचा उपकर्णधार
जेव्हा शेन वॉर्नला तंबूत धाडताच हरभजनचे नाव क्रिकेट इतिहासात ‘असा’ पहिलाच भारतीय म्हणून नोंदवले गेले
हेही पाहा-