---Advertisement---

हा तर भारताचा ‘मिस्टर 360’ ! हरभजनने केली ‘या’ क्रिकेटपटूची डिविलियर्सशी तुलना

On: शुक्रवार, नोव्हेंबर 13, 2020 12:05 PM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्स हा त्याच्या मैदानात चौफेर फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहे. त्याचमुळे त्याला मिस्टर 360 असंही म्हटलं जाते. पण आता भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने भारताच्या युवा क्रिकेटपटूची तुलना डिविलियर्सशी केली आहे.

हा तर भारताचा मिस्टर 360 

मुंबई इंडियन्सने पाचवे इंडियन प्रीमियर लीग जेतेपद पटकावले आहे. त्यांच्या या मोहिमेतील महत्त्वाचा खेळाडू ठरला तो फलंदाज सूर्यकुमार यादव. त्याने 16 सामन्यांत 40 च्या सरासरीने आणि 145.01 च्या स्ट्राइक रेटने 480 धावा केल्या. त्याच्या या कामगिरीने प्रभावित होत नुकतेच हरभजनने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना त्याला भारताचे एबी डिव्हिलियर्स असे म्हटले आहे.

“सूर्यकुमार यादवने स्वतःला गेम-चेंजर पासून मुंबई इंडियन्सचा विजयामागील महत्त्वाचा खेळाडू म्हणून सिद्ध केले. त्याने त्यांच्या फलंदाजीची बरीच जबाबदारी स्वीकारली होती,” असे हरभजन म्हणाला.

तसेच हरभजन म्हणाला, “असं नाही की तो १०० च्या स्ट्राइक रेटवर खेळतो, जर आपण त्याचा स्ट्राइक रेट पाहिला तर तो कधीकधी पहिल्याच चेंडूवर फटका मारण्यास देखील सुरुवात करतो.”

“त्याला रोखणे कठीण आहे कारण त्याच्याकडे सर्व प्रकारचे शॉट्स आहेत. तो आरामात कव्हर मारू शकतो, स्वीपही चांगला खेळतो, स्पिन चांगला खेळतो, वेगवान गोलंदाजी जबरदस्त खेळतो. तो भारतीय एबी डिव्हिलियर्स आहे, ‘असे हरभजन पुढे म्हणाला.

भारताकडून मिळायला हवी होती संधी 

सुर्यकुमारने सातत्याने चांगली कामगिरी करुनही त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड न झाल्याने अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. यामध्ये हरभजन सिंगचाही समावेश होता. त्यानेही अनेकदा सुर्यकुमारला भारतीय संघात स्थान मिळायला हवे, असे मत व्यक्त केले आहे.

“मला वाटते की त्याची निवड भारतीय संघात व्हायला हवी होती. असे घडले नाही परंतु, तो त्यापासून फार दूर नाही. तो अविश्वसनीय खेळाडू आहे. सूर्यकुमार यादवने ज्या प्रकारची फलंदाजी केली त्याने सर्वांनाच आपल्याकडे आकर्षित केले.”

सूर्यकुमारने प्रभावित केलेला हा पहिला हंगाम नाही. मुंबई संघामध्ये आल्यापासून सूर्यकुमार ने 2018 मध्ये 512 , 2019 मध्ये 424 आणि 2020 मध्ये 480 धावा केल्या आहेत. गौतम गंभीर, इयान बिशप आणि टॉम मूडी यांनी देखील सूर्यकुमारचे कौतुक केले आहे, तसेच त्यांनी त्यांच्या आयपीएल इलेव्हनमध्येही प्रवेश केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

रिकामी मैदाने असूनही आयपीएल २०२० ठरला आतापर्यंतचा सर्वात यशस्वी हंगाम

धोनीने नक्की काय सल्ला दिला की ऋतुराजने ठोकली सलग तीन अर्धशतके, घ्या जाणून

हृदयविकाराच्या झटक्यानंतर कपिल देव पुन्हा गोल्फ कोर्सवर, पाहा व्हिडिओ

ट्रेंडिंग लेख –

…म्हणून रोहित शर्मा आणि नोव्हेंबर महिन्याचे नाते खासच!

…तेव्हा एमएस धोनीने केलेली ‘ती’ भविष्यवाणी रोहित शर्माने खरी करून दाखवली!

…आणि हिटमॅन रोहित शर्मा झाला ‘स्टार क्रिकेटर’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---