टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात दुर्लक्षित झालेल्या पृथ्वी शॉला मोठा सल्ला दिला आहे. हरभजनने पृथ्वी शॉला सांगितले आहे की जेव्हा फिटनेसचा प्रश्न येतो तेव्हा तू विराट कोहलीकडे पहा. लोकांनी सचिन तेंडुलकरशी तुलना करून चूक केली. असेही भज्जीने म्हटले आहे. पृथ्वी शॉ अंडर 19 विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार आहे. त्याच्या सहकारी खेळाडूंना लिलाव आणि रिटेन्शनमध्ये मोठी रक्कम मिळाली. परंतु शाॅला कोणत्याही संघाने त्याला विकत घेतले नाही. पृथ्वी शॉची मूळ किंमत 75 लाख होती. त्याचे नाव लिलावातही आले. पण त्याच्यावर कोणीही बोली लावली नाही.
हरभजनने पृथ्वी शाॅच्या पडझडीवर भाष्य केले. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात शॉची सचिन तेंडुलकरशी तुलना करून सर्वांनी चूक केली. असे माजी फिरकीपटूला वाटते. त्यावेळी पृथ्वी शॉबद्दल समालोचन करताना रवी शास्त्री एक पाऊल पुढे गेले होते. ते म्हणाले होते की तो लहान सचिन तेंडुलकर, थोडा वीरेंद्र सेहवाग आणि थोडा ब्रायन लारा यांची झलक देतो.
यावर हरभजन सिंगने मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “त्याच्याबद्दल नेमके काय घडले ते मला माहित नाही, परंतु मला वाटते की पृथ्वी शॉला त्याची कारकीर्द कशी पुढे न्यावी हे ठरवावे लागेल.” अशा गोष्टी एकतर करियर बनवतात किंवा संपवतात. लिलावात विकले न जाणे हे पचवणे खूप कठीण आहे”.
तो पुढे म्हणाला, “मी त्याला शुभेच्छा देतो. मला आशा आहे की तो या धक्क्यातून आणखी मजबूत होईल. त्याच्या फिटनेसवर कठोर परिश्रम करेल. तो खूप तरुण आहे. तो आता सुमारे 24-25 वर्षांचा असेल. जर त्याने फिटनेसवर लक्ष केंद्रित केले तर तो खूप पुढे जाऊ शकतो.
हेही वाचा-
15 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर या संघानं वेस्ट इंडिजमध्ये कसोटी सामना जिंकला, मालिका बरोबरीत
IND vs AUS: टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक बदल निश्चित, रोहित शर्मा हा मोठा निर्णय घेणार का?
5 संघांनी खेळले सर्वाधिक टी20 आंतरराष्ट्रीय सामने, पाकिस्तानने रचला इतिहास…!