त्यामुळे हरभजनचा (Harbhajan Singh) असा विश्वास आहे, की चॅपेल यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे वातावरण योग्य नव्हते आणि खेळाडूंनी एकमेकांवर विश्वासही ठेवला नाही.
“जेव्हा चॅपेल (Greg Chappell) संघाचे प्रशिक्षक होते, तेव्हा त्यांनी संपूर्ण संघात अडथळा आणला होता. ते कोणत्या हेतूने संघात आले होते, हे मला माहीत नाही. संघामध्ये अडथळा कसा निर्माण करायचा, हे त्यांच्यापेक्षा चांगले इतर कोणालाही माहीत नाही. त्यांचा हेतू काय आहे, हे केवळ देवालाच ठाऊक आहे. संपूर्ण त्यांच्या मार्गदर्शनाखाली होते. त्यांना ज्या गोष्टी हव्या असायच्या त्या ते करायचे,” असा आरोप भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राबरोबर (Aakash Chopra) त्याच्या ‘आकाश वाणी’ या यूट्यूब चॅनेलवर झालेल्या व्हिडिओ मुलाखतीत हरभजनने केला.
खेळण्यात लागत नव्हते मन
“२००७ सालचा वनडे विश्वचषक माझ्या कारकीर्दीतील सर्वात वाईट स्पर्धा होती. मला वाटले, की आम्ही इतक्या कठीण काळातून जात आहोत, तेव्हा मी असा विचार केला की कदाचित भारतीय संघाकडून खेळण्याची ही योग्य वेळ नाही. कारण चूकीचे लोक भारतीय क्रिकेट चालवत होते,” असे चॅपेल यांच्याबद्दल बोलताना हरभजन म्हणाला.
“मला वाटले की हे लोक भारतीय क्रिकेट उद्ध्वस्त करण्यासाठी आले आहेत. चॅपेल कोण आहेत?, ते अशा गोष्टी का करत आहेत? ते फोडा आणि राज्य करा या नीतिचा अवलंब करण्याचा प्रयत्न करत होते,” असेही हरभजन पुढे म्हणाला.
कमकुवत संंघाविरुद्ध झाला पराभव
“आमच्याकडे २००७च्या वनडे विश्वचषकासाठी एक मजबूत संघ होता. परंतु आम्हाला चांगली कामगिरी करता आली नव्हती. कारण कोणीही मनापासून आपले योगदान देत नव्हते. कोणीही एकमेकांवर विश्वास ठेवत नव्हते. जेव्हा संघ आनंदात नसतो तेव्हा अपेक्षित निकाल मिळत नाही. आम्ही श्रीलंका (Sri Lanka) आणि बांगलादेशसारख्या (Bangladesh) संघाविरुद्ध पराभूत झालो होतो, जे फार मोठे संघ नव्हते,” असे भारतीय संघाबद्दल बोलताना हरभजन म्हणाला.
भारताला आपल्या गट सामन्यांमध्ये श्रीलंका आणि बांगलादेशविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे संघाला स्पर्धेतून बाहेर जावे लागले होते.
वनडे विश्वचषक २००७चे विजेतेपद ऑस्ट्रेलिया संघाने आपल्या नावावर केले होते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-२०१०ला शेवटचा सामना खेळलेला ४०वर्षीय खेळाडू म्हणतोय, मला क्रिकेट खेळू द्या!
-खेल रत्न पुरस्कारासाठी हिमा दासच्या नावाची शिफारस; बनली सर्वात युवा ऍथलीट…
-स्टीव स्मिथकडून स्तुतीसुमने: म्हणतोय, ‘हा’ भारतीय खेळाडू फिल्डींगमध्ये जगात भारी