---Advertisement---

“तिथे तुमचा वेळ वाया घालवू नका, भारतात परत या”, हरभजन सिंगचा पाकिस्तानी प्रशिक्षकाला सल्ला

On: मंगळवार, जून 18, 2024 7:48 AM
---Advertisement---

भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग सध्या चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू कामरान अकमलसोबत वाद झाला होता. आता तो पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकांना सल्ला दिल्यामुळे चर्चेत आला आहे. भज्जीनं पाकिस्तानच्या कोचला, तिथे आपला वेळ वाया घालवू नका तर भारतात या, असा सल्ला दिला आहे.

वास्तविक, टी20 विश्वचषकापूर्वी पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेच्या गॅरी कस्टर्न यांना मुख्य प्रशिक्षक बनवलं होतं. मात्र त्यांच्या कोचिंगमध्ये पाकिस्तान संघाची विश्वचषकातील कामगिरी खूपच खराब राहिली. संघ साखळी फेरीतूनच बाद झाला. यानंतर बोलताना कस्टर्न यांनी, पाकिस्तान संघात एकता नसल्याचं म्हटलं होतं.

गॅरी कस्टर्न म्हणाले होते, “पाकिस्तान संघात एकता नाही. आपण याला टीम म्हणतो, मात्र ही टीम नाही. ते एकमेकांना सपोर्ट करत नाहीत. प्रत्येक जण वेगळा झाला आहे. मी अनेक संघांसोबत काम केलं आहे, मात्र अशी परिस्थिती कधीच पाहिली नाही.”

यावर उत्तर देताना भज्जीनं ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं, गॅरी, तुम्ही तेथे आपला वेळ वाया घालवू नका. तुम्ही भारतीय संघाला प्रशिक्षण देण्यासाठी परत या. गॅरी कस्टर्न हिऱ्यासारखे आहेत. शानदार कोच, मेंटॉर आणि आमच्या विश्वविजेत्या 2011 संघाचे कोच. ते खूप खास व्यक्ती आहेत.”

 

येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, गॅरी कस्टर्न हे तेच कोच आहेत, ज्यांच्या कोचिंग मध्ये भारतीय संघानं 2011 मध्ये विश्वचषक जिंकला होता. त्यांचं भारतीय क्रिकेटसाठी मोलाचं योगदान राहिलं आहे.

पाकिस्ताननं टी20 विश्वचषक सुरु होण्यापूर्वी गॅरी कस्टर्न यांना हेड कोच बनवलं होतं. मात्र त्यांच्या कोचिंग मध्ये पाकिस्तानचा संघ विश्वचषकात सपशेल अपयशी ठरला. पाकिस्तानचा साखळी सामन्यात अमेरिकेकडून पराभव झाला, त्यामुळे ते सुपर 8 मध्ये देखील प्रवेश करू शकले नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

आश्चर्यकारक! लाॅकी फर्ग्युसननं रचला इतिहास, टी20 विश्वचषकात अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू
टी20 विश्वचषकादरम्यान गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट
जॉन्टी रोड्स बनणार टीम इंडियाचा नवा फिल्डिंग कोच?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---