---Advertisement---

VIDEO: जब मिले दो जिगरी यार! कोलकाता-दिल्ली सामन्यापूर्वी मैदानावर शिखरची हरभजनला कडाडून मिठी

On: बुधवार, सप्टेंबर 29, 2021 10:13 AM
---Advertisement---

मंगळवारी (२८ सप्टेंबर) इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळाला. यामध्ये पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने अप्रतिम कामगिरी करत दिल्ली कॅपिटल्स संघावर ३ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह कोलकाता नाईट रायडर्स संघाची प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता वाढली आहे. दरम्यान सामना सुरू होण्यापूर्वी बऱ्याच दिवसानंतर भेट होणाऱ्या शिखर धवन आणि हरभजन सिंग यांच्यात मैत्रिपूर्ण संबंध पाहायला मिळाले.

आयपीएल स्पर्धेची खासियत म्हणजे, आपले आवडते खेळाडू मैदानात एकमेकांविरुद्ध झुंज देत असतात. सामना सुरू असताना या खेळाडूंमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत असते. परंतु सामना सुरू होण्यापूर्वी किंवा सामना झाल्यानंतर हे खेळाडू एकमेकांसोबत मस्ती करताना दिसून येत असतात.

अशातच कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यापूर्वी हरभजन सिंग आणि शिखर धवन हे मस्ती करताना दिसून आले होते. व्हायरल होत असलेल्या व्हिडियोमध्ये तुम्ही पाहू शकता की, हरभजन सिंग आणि शिखर धवन हे दोघेही मित्र सामन्यानिमित्ताने बऱ्याच दिवसांनंतर एकत्र येतात. यावेळी शिखर धवन हरभजन सिंगला घट्ट मिठी मारतोय. खूप दिवसांनंतर हे दोघेही खेळाडू एकत्र दिसून आले. त्यामुळे यांच्यात संवाद देखील पाहायला मिळाला.

हा व्हिडीओ आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या सामन्यात देखील हरभजन सिंगला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र शिखर धवनच्या दिल्लीच्या अंतिम एकादशचा भाग होता.

https://twitter.com/IPL/status/1442789095860629507

कोलकाता नाईट रायडर्स संघाचा ३ गडी राखून विजय
कोलकाता नाईट रायडर्स संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना, स्टिव्ह स्मिथ आणि रिषभ पंत यांनी प्रत्येकी ३९-३९ धावांची खेळी केली होती. तर शिखर धवनने २४ धावांचे योगदान दिले होते. इतर कुठल्याही फलंदाजांना साजेशी कामगिरी करता आली नव्हती. ज्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाला २० षटक अखेर ९ बाद १२७ धावा करण्यात यश आले होते.

या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून नितीश राणाने सर्वाधिक ३६ धावांची खेळी केली होती. तर शुबमन गिलने ३० धावांची खेळी केली. यासह १० चेंडू शिल्लक ठेऊन ३ गडी राखून विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या-

अगग! बिश्नोईने अवघ्या ८ धावांवर रोहितला दाखवला पव्हेलियनचा रस्ता, लाजिरवाण्या विक्रमात बनला नंबर १

लाईव्ह सामन्यातील ‘त्या’ विवादावरुन कार्तिकने उठवला पडदा, सांगितले का अश्विनवर भडकला मॉर्गन?

पंजाबविरुद्धच्या सामन्यापूर्वी संजनाने केली होती भविष्यवाणी, बुमराह घेईल ‘इतक्या’ विकेट्स अन्…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---