---Advertisement---

तो व्यक्ती ‘गेम’ करुन धोनीला काढणार होता संघाबाहेर

On: शनिवार, मे 16, 2020 9:32 AM
---Advertisement---

भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांचा भारतीय संघाच्या प्रशिक्षणाचा कालावधी वादांनी भरलेला होता. त्यांच्यावर भारतीय संघातील खेळाडूंना मुद्दाम संघाबाहेर काढण्याचे आरोप आहेत. चॅपेल यांनी नुकत्याच सोशल मीडियावरील एका लाइव्ह सेशनदरम्यान भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीविषयी मोठा खुलासा केला होता.

चॅपेल म्हणाले की, “२००५मध्ये श्रीलंकाविरुद्धच्या वनडे सामन्यात त्यांनी धोनीला षटकार मारण्यास नकार दिला होता. जेणेकरुन भारतीय भारतीय संघ कोणतीही जोखीम न घेता आरामात तो सामना जिंकेल.” चॅपेल यांच्या या विधानामुळे भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंग आणि भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. हरभजनने म्हणणे आहे की, चॅपेल यांना धोनीला संघाच्या बाहेर काढायचे होते.

याबाबतीत हरभजनने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करत म्हटले आहे की, “चॅपेल यांनी धोनीला खालून शॉट खेळण्यास यासाठी सांगितले होते की त्यांना प्रत्येकाला मैदानाबाहेर काढायचे होते. ते वेगळ्याच प्रकारची गेम खेळत होते. हरभजनने ट्विट करत भारतीय क्रिकेटचा ग्रेग यांच्या मार्गदर्शनाखालील सर्वात वाईट दिवस असा हॅशटॅगही दिला आहे.”

तर युवराजनेही ट्विट करत लिहिले आहे की, “एमएसडी (धोनी) आणि युवी शेवटच्या षटकात एकही षटकार नका मारु फक्त ग्राउंड शॉट्स खेळा.” म्हणजे यावरुन युवराजने चॅपेल यांची अप्रत्यक्षपणे खिल्ली उडवली आहे.

चॅपेल यांनी लाइव्ह सेशनमध्ये म्हटले होते की, “मला आठवण आहे की, मी धोनीला पहिल्यांदा मैदानावर फलंदाजी करताना पाहून चकित झालो होतो. त्यावेळी धोनी भारतीय संघातील  उभरता खेळाडू होता. तो खूप वेगवेगळ्या पोजिशनमध्ये फलंदाजी करायचा. मी आतापर्यंत जेवढेही फलंदाज पाहिले आहेत. त्यापैकी धोनी हा सर्वाधिक शक्तिशाली फलंदाज असल्याचे मला वाटते.”

“मला धोनीची श्रीलंकाविरुद्धची १८३ धावांची खेळी अजूनही आठवण आहे. शेवटी आम्हाला जिंकण्यासाठी २० धाावंची आवश्यकता होती आणि धोनीने १२व्या क्रमांकावरील खेळाडू आरपी सिंगद्वारे मला षटकार मारु का नको? हे विचारले होते. त्यावर मी त्याला नकार दिला होता.  मी त्याला म्हणालो होतो की, तेव्हापर्यंत षटकार नको मारु जेव्हापर्यंत आपण आव्हानाची बरोबरी करत नाही. पण अखेर षटकार मारत धोनीने सामना संपवला होता.”

चॅपेल यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाने २००७च्या विश्वषकात श्रीलंका आणि बांग्लादेश संघाविरुद्धचा सामना गमावला होता. भारतीय संघ पहिल्याच फेरित विश्वचषकातून बाहेर पडला होता. त्यानंतर अनेक भारतीय खेळाडूंनी चॅपेल यांच्या विरोधात तक्रार केल्याने त्यांना प्रशिक्षकपदावरुन हटवण्यात आले होते.

ट्रेंडिंग घडामोडी-

IPL नाही म्हणून काय झाले, आता होणार IPLपेक्षाही वेगवान लीग; तीदेखील लाॅकडाऊनमध्ये

ते दृष्य पाहुन केविन पीटरसनला आला राग, म्हणाला निव्वळ मुर्खपणा आहे

आवाज वाढीव डीजे! प्रेक्षकांविना सामने झाले तर मैदानावर थेट स्पिकर्सवर…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---