कोरोना व्हायसरच्या प्रादुर्भावामुळे गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेट क्षेत्र ठप्प पडले आहे. अशात क्रिकेटच्या अनेक मालिका रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या होत्या. पण, आता या व्हायरसचा प्रभाव थोडा आटोक्यात आलेला दिसत असल्याने, विभिन्न देशातील क्रिकेट बोर्ड रिकाम्या स्टेडियमध्ये क्रिकेटचे आयोजन करण्याचा विचार करत आहेत.
यावर, जगातील सर्वात खतरनाक वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने एक अनोखी मागणी केली आहे. इंग्लंड संघाच्या आर्चरने म्हटले आहे की, “त्याला रिकाम्या स्टेडियममध्ये खेळताना प्रेक्षकांचा आवाज ऐकायचा आहे. यासाठी त्याने उपायही सुचवला आहे. तो म्हणाला की, कोविड-१९मुळे जर क्रिकेटचे आयोजन रिकाम्या स्टेडियममध्ये करण्यात आले. तर, तिथे प्रेक्षकांचा आवाज ऐकू येण्यासाठी ऑडियो लावायला पाहिजे.” Jofra Archer suggested playing audio of crowd noise to create realistic atmosphere if cricket held in closed doors.
आर्चर बीबीसी पॉडकास्ट स्टंप्डमध्ये बोलताना म्हणाला की, “क्रिकेट सामन्यांदरम्यान आपण संगिताचा वापर करतो. मग प्रेक्षकांच्या उपस्थितीची जाणीव होण्यासाठी त्यांचा ऑडियो का नाही लावू शकत? प्रेक्षकांच्या टाळ्या वाजवण्याचा, त्यांचा ‘ऊ’ आणि ‘आ’ अशा आवाजांचा ऑडियो लावू शकतोत. रिकाम्या स्टेडियममधील सामन्यांना जेवढे वास्तविक रुप देता येईल, तेवढे देण्याचा प्रयत्न करण्यात यावा.”
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) पूर्णपणे सुरक्षित ठिकाणांवर क्रिकेटचे आयोजन करण्याचा विचार करत आहे. तिथे खेळाडूंची राहण्याची व्यवस्था ही स्टेडियममध्येच करण्यात येईल आणि तिथे खेळाडूंचे वारंवार परिक्षणही करण्यात येईल.
ईसीबीच्या या निर्णयाला सहमती देत, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुडने गेल्या आठवड्यात म्हटले होते की, “इंग्लंडचे खेळाडू या उन्हाळ्यात क्रिकेट खेळण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी राहण्यासाठी तयार आहेत.” तसेच, आर्चरच्या उपायाविषयी वुडला विचारले असता. तो म्हणाला की, “ते करावे, ज्यामुळे क्रिकेटला मदत होईल आणि शक्य तितके आम्हाला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करावा.”
ट्रेंडिंग घडामोडी-
रोहित, कोहलीमुळे बीसीसीआय वैतागली, मोहम्मद शमीचं मात्र नाही काहीच…
ना विराट; ना पृथ्वी शाॅ, हाच आहे भारताचा अंडर १९चा टाॅप कर्णधार
एमएस धोनीचे कर्णधार म्हणून घेतलेले खतरनाक ३ निर्णय, ज्यांनी सामना एकहाती फिरवला