---Advertisement---

कमाल! ब्रेंडन मॅक्यूलमने टेनिस रॅकेटने मारलेल्या चेंडूवर ४० वर्षीय हरभजन सिंगने घेतला भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ

On: गुरूवार, एप्रिल 8, 2021 10:21 PM
---Advertisement---

आयपीएल स्पर्धेची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. उद्यापासून (९ एप्रिल ) आयपीएलच्या १४ व्या हंगामाला प्रारंभ होणार आहे. याच पार्श्वभूमीवर, आपले तिसरे जेतेपद पटकावण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स संघ मैदानात घाम गाळताना दिसून येत आहे. अशातच कोलकाता नाईट रायडर्स संघाने क्षेत्ररक्षणाचा सराव करतानाचा एक व्हिडिओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे, जो वेगाने व्हायरल होत आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघाची पहिली लढत सनरायजर्स हैदराबाद संघासोबत रंगणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स संघाने सराव करत असतानाचा एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये, कोलकाता नाईट रायडर्स संघाचा प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्यूलम हा टेनिस रॅकेटने चेंडू मारत खेळाडूंकडून झेल घेण्याचा सराव करून घेताना दिसत आहे. तसेच व्हिडिओच्या शेवटी, संघात नव्याने सहभागी झालेल्या ४० वर्षीय हरभजन सिंगनेही एक उत्कृष्ट झेल टिपल्याचे दिसले आहे.

https://www.instagram.com/p/CNVBet1lA4i/

हरभजन २०१८ सालापासून चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळत होता. पण युएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० हंगामात हरभजन सिंगने न खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर २०२१ आयपीएल लिलावाआधी त्याला चेन्नई सुपर किंग्सने आपल्या संघातून मुक्त केले होते. त्यानंतर त्याला लिलावादरम्यान कोलकाता नाईट रायडर्सने खरेदी केली. त्यामुळे यंदा तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना दिसणार आहे.

४० वर्षीय हरभजन सिंग फिटनेसचा बाबतीत आजही भल्या भल्या युवा खेळडूंना पाणी पाजू शकतो. याचेच प्रात्यक्षिक तो मैदानात सादर करताना दिसून येत आहे. आगामी हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाला त्याच्या अनुभवाचा नक्की फायदा होऊ शकतो.

तसेच दिनेश कार्तिकने हरभजन सिंगबद्दल वक्तव्य करताना म्हटले की, “हरभजन सिंग येत्या जुलै महिन्यात ४१ वर्षाचा होणार आहे. परंतु, त्याच्यात अजुनही संघासाठी चांगली कामगिरी करण्याचा तोच उत्साह आहे. तो फिट आहे आणि मैदानात एका नव्या भूमिकेत उतरणार आहे. तो इतर खेळाडूंच्या आधीच मैदानात सराव करण्यासाठी उपस्थित असतो. या आठवड्यात मी जितकं पाहिलं आहे तो नेहमी असंच करत आहे.”

महत्त्वाच्या बातम्या –

क्या बात हैं! दिनेश कार्तिकचा दिसला आक्रमक अंदाज, चौकार-षटकारांची केली बरसात, पाहा व्हिडिओ

कौतुकाची थाप तर बनतेच! संंघाचं सोडा, धुंवाधार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा चेन्नईकडून सत्कार, हे पाहा फोटो

आनंदाची बातमी! ‘मास्टर-ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर हॉस्पिटलमधून परतला घरी; लिहिला ‘हा’ खास संदेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---