सध्या भारतीय क्रिकेटमध्ये निवडसमिती ही सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. मागील जवळपास चार महिन्यांच्या कालावधीत निवड समितीमध्ये बरेच बदलले झालेत. टी20 विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर भारतीय वरिष्ठ पुरुष संघाची निवड समिती बरखास्त करण्यात आलेली. मात्र, त्यानंतर दीड महिन्याच्या कालावधीत त्याच समितीतील चेतन शर्मा यांना मुख्य निवडकर्ता बनवले गेले. काही दिवसांपूर्वीच एका स्टिंग ऑपरेशनमध्ये भारतीय क्रिकेटमधील अनेक धक्कादायक खुलासी करणाऱ्या शर्मा यांना आपला राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता त्यांची जागा रिक्त आहे. परंतु, निवड समितीच्या जागेसाठी अनुभवी खेळाडू का अर्ज करत नाहीत याचा खुलासा नुकताच माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग याने केला.
एका कार्यक्रमात बोलताना हरभजन सिंग याने जास्त अनुभव असलेले भारतीय क्रिकेटपटू निवड समितीत काम का करत नाही याबाबत आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला,
“तुम्हाला जर अधिक अनुभव असलेले माजी क्रिकेटपटू निवड समितीत हवे असतील तर तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल. त्या खेळाडूंना मुख्य प्रशिक्षका इतकी रक्कम द्यावी लागू शकते. वीरेंद्र सेहवाग याचे उदाहरण द्यायचे झाल्यास तो पात्र ठरत असला तरी तुम्हाला त्याच्या अनुभवाकडे पाहून मोठी किंमत द्यावी लागणार. कारण, ते खेळाडू तसा निकालही देतात. अन्यथा त्यांच्याकडे समालोचन करून अधिक पैसे कमावण्याची संधी असते.”
माध्यमातील वृत्तानुसार, सध्या भारतीय निवड समिती अध्यक्षाला एक कोटी रुपयांचे वार्षिक वेतन मिळते. तर, इतर सदस्यांना 90 लाख वार्षिक वेतन देण्यात येते. दुसरीकडे, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड दरवर्षी तब्बल सात कोटी रुपये घेतात.
(Harbhajan Singh Disclose Reason Behind Why Big Indian Cricketers Not Apply For Selectors Post)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी खेळाडूच्या वयामुळे पेटला नवीन वाद, ‘तुम्हीच सांगा कोणत्या एँगलने 16 वर्षांचा दिसतो हा खेळाडू’
‘या’ खेळाडूला दुर्लक्षित करून ऑस्ट्रेलियाने केली मोठी चूक, भारतीय दिग्गजाचा खुलासा