भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात आगामी 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघ जाहीर देखील करण्यात आला आहे. दोन्ही संघ (16 ऑक्टोबर) रोजी बेंगळुरूच्या मैदानावर पहिल्या कसोटी सामन्यासाठी आमने-सामने येणार आहेत. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण भारत-न्यूझीलंड संघात झालेल्या कसोटी सामन्यात सर्वाधिक षटकार कोणत्या खेळाडूने ठोकले आहेत. हे जाणून घेऊया.
या यादीत वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag), सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), सौरव गांगुली (Sourav Ganguly), महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) किंवा ब्रेंडन मॅक्युलम (Brendon McCullum) या दिग्गजांची नाव अव्वल असतील, असा विचार चाहत्यांच्या मनात येत असेल पण तसे नाही. भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकाॅर्ड भारतीय गोलंदाजाच्या नावावर आहे.
हा फिरकी गोलंदाज दुसरा कोणी नसून हरभजन सिंग (Harbhajan Singh) आहे, जो कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी चौथा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. पण आकडेवारीनुसार भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज आतापर्यंत हरभजन सिंग (Harbhajan Singh) राहिला आहे. त्याने 13 सामने खेळताना 17 षटकार मारले. त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानावरही गोलंदाजच आहे. न्यूझीलंडच्या टीम साऊदीने 15 षटकार ठोकले आहेत.
2010 पासून या यादीत हरभजन सिंग पहिल्या स्थानावर आहे. न्यूझीलंडच्या टीम साऊदी व्यतिरिक्त, सध्याच्या कोणत्याही क्रिकेटपटूला हरभजनच्या या रेकाॅर्डच्या आसपास जाण्यात यश आले नाही. हरभजनने नोव्हेंबर 2010 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध कानपूरमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत फक्त 2 शतके झळकावली होती आणि दोन्ही शतके न्यूझीलंडविरुद्ध झळकावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs BAN; शानदार विजयानंतर प्रशिक्षकाची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…
बाबरची तुलना कोहलीशी करणं माजी खेळाडूला पडलं महागात! चाहत्यांनी केलं प्रचंड ट्रोल
IND vs NZ; कसोटी मालिकेत किवी फलंदाजाने घातला होता धुमाकूळ! 68 वर्षापासून रेकाॅर्ड कायम