आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (ICC Champions Trophy) 2025 सुरू होण्यास फारसा वेळ शिल्लक राहिला नाही. दरम्यान पाकिस्तानने आयोजित केलेल्या या मेगा स्पर्धेत खेळण्यासाठी सर्व संघ सज्ज आहेत. पाकिस्तान आणि यूएईमध्ये हायब्रिड मॉडेल अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी एकामागून एक संघ जाहीर केले जात आहेत. पण सर्व क्रिकेट चाहत्यांच्या नजरा आता भारतीय संघावर खिळल्या आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट संघाचा 15 सदस्यीय संघ काही दिवसात जाहीर होईल. याआधी, गेल्या काही दिवसांपासून, क्रिकेट तज्ज्ञ त्यांच्या आवडत्या संघांची निवड करत आहेत. त्यामध्ये आता माजी भारतीय दिग्गज क्रिकेटपटू हरभजन सिंगने (Harbhajan Singh) देखील त्याच्या आवडत्या भारतीय संघाची निवड केली आहे.
हरभजन सिंगने आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्माला (Rohit Sharma) भारतीय संघाचा कर्णधार म्हणून निवडले आहे. त्याने जवळजवळ सर्व प्रमुख खेळाडूंना संधी देखील दिली. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने केएल राहुलची (KL Rahul) निवड केली नाही. त्याच्या मते, यशस्वी जयस्वालला (Yashasvi Jaiswal) रोहित शर्मासोबत संघात सलामीची संधी मिळायला हवी.
यानंतर, त्याने विराट कोहलीला (Virat Kohli) तिसऱ्या स्थानी ठेवले, तर चौथ्या स्थानी श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) संधी दिली. यानंतर तिलक वर्माचा (Tilak Verma) समावेश केला आहे. हरभजन सिंग म्हणाला की संजू सॅमसन (Sanju Samson) किंवा रिषभ पंत (Rishabh Pant) यापैकी एकाला यष्टीरक्षक म्हणून निवडले पाहिजे. हरभजनने हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) त्याच्या संघात पुढे ठेवले आहे, तर त्याने रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) जागी अक्षर पटेलला (Axar Patel) संधी दिली आहे. याशिवाय कुलदीप यादव (Kuldeep Yadav), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यांचादेखील समावेश करण्यात आला आहे.
हरभजन सिंगने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडलेला भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, संजू सॅमसन किंवा रिषभ पंत, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, नितीश कुमार रेड्डी, शुबमन गिल, युझवेंद्र चहल
महत्त्वाच्या बातम्या-
पंजाब किंग्जला मिळाला नवा कर्णधार, सलमान खान करणार घोषणा
आयपीएल 2025च्या वेळापत्रकात बदल, कधी आणि कुठे होणार फायनल सामना?
PD Champions Trophy; भारताने उडवला पाकिस्तानचा धुव्वा, मिळवला दणदणीत विजय