संपूर्ण भारतात कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजला आहे. दररोज लक्षावधी लोक या आजाराने बाधित होत आहेत तसेच, रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. वैद्यकीय साहित्याचा तुटवडा भासू लागल्याने परिस्थिती दिवसेंदिवस खराब होऊ लागली आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपापल्या परीने नागरिकांना मदत करण्यास सुरुवात केली आहे. भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग यानेदेखील मदतीचा हात पुढे केला.
पुणेकरांच्या मदतीला धावला हरभजन
संपूर्ण देशामध्ये कोरोनाने थैमान घातले असताना महाराष्ट्रात देखील रोज लाखो रूग्ण या आजाराच्या विळख्यात येत आहेत. पुणे शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. अशा परिस्थितीत भारताचा दिग्गज क्रिकेटपटू हरभजन सिंग पुणेकरांच्या मदतीला धावून आला आहे.
हरभजनने कोरोना रुग्णांना ओळखण्यासाठी करण्यात येणारी RTPCR टेस्ट व रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यासाठी मोबाईल व्हॅन उपलब्ध करून दिली आहे. ही व्हॅन संपूर्ण पुणे शहरात २४ तास उपलब्ध असेल. या सुविधेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज (२७ एप्रिल) करण्यात आले.
आयपीएलमध्ये खेळतोय हरभजन
सध्या ४० वर्षाचा असलेला हरभजन आयपीएल २०२१ मध्ये कोलकत्ता नाइट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. हरभजन हा सामाजिक जाण असलेला क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. मागील वर्षी कोरोना लॉकडाऊनमध्ये त्याने पाकिस्तानमध्ये माझी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या स्वयंसेवी संस्थेला मदत केली होती. तसेच, चंदीगडमध्ये गरिबांसाठी मोफत लंगर देखील सुरू केलेला.
महत्त्वाच्या बातम्या –
कौतुकास्पद! एकीकडे परदेशी खेळाडू माघार घेत असताना पॅट कमिन्स आला भारतातील कोरोनाग्रस्तांच्या मदतीला
बल्ले बल्ले! ख्रिस गेलचा ‘पंजाबी स्वॅग’, संघ सहकाऱ्यांसोबत केला भांगडा; एकदा पाहाच
कोलकाताला पंजाबविरुद्ध सूर गवसणार? ‘अशी’ असेल राहुल-मॉर्गनच्या संघांची प्लेइंग इलेव्हन






