क्रिकेटच्या मैदानात भारतीय संघाला अनेकदा संकटातून बाहेर काढणारा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग सध्या राजकारणात सक्रिय झाला आहे. त्याने आपल्याच या जबाबदारीतून एक सामाजिक काम केले. त्याने नुकतेच आखाती देश ओमानमध्ये ओलीस ठेवलेल्या भारतातील एका मुलीला वाचवण्यात मोठी भूमिका बजावली आहे. आम आदमी पक्षाचा राज्यसभा सदस्य असलेल्या हरभजनने ओमानमधील भारतीय दूतावासासह भटिंडा येथील 21 वर्षीय कमलजीत कौर यांना वाचवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. मुलीला तिच्या मालकाने बेकायदेशीरपणे ओलीस ठेवले होते. तिचा पासपोर्ट आणि सिमकार्डही जप्त करण्यात आलेले.
या घटनेबद्दल हरभजनला विचारले असता, त्याने एका वृत्तसंस्थेला सांगितले की, “ओमानमधील भारतीय दूतावास आणि भारतीय राजदूत अमित नारंग यांच्या मदतीशिवाय हे शक्य झाले नसते. त्यांचे योगदान अमूल्य आहे. मी फक्त माझे काम केले. कमलजीत पंजाबमधील तिच्या घरी परतली. ती सुरक्षित आहे हे कळवण्यासाठी भारतीय दूतावासाने मला फोन केला होता. कमलजीत सुरक्षित असल्याचे ऐकून आनंद झाला.”
पंजाबच्या भटिंडामधील बरकंडी येथील 21 वर्षीय कमलजीत कौर हिला नोकरीच्या आमिषाने ओमान ची राजधानी मस्कत येथे नेले गेले होते. तेथे का हिंदी भाषिक जोडप्याच्या येथे स्वयंपाकी म्हणून तिला काम दिले गेलेले. यादरम्यान तिला मारहाण झाल्याचे देखील तिच्या वडिलांनी सांगितले. आपल्या मुलीला मारहाण झाली, जबरदस्तीने बुरखा घालण्यास व अरबी भाषा शिकण्यास प्रवृत्त केल्याचा देखील आरोप त्यांनी केला. मात्र, भारतीय दूतावास व हरभजन सिंग यांच्या मदतीमुळे आपली मुलगी माघारी आल्याचे समाधान असल्याचे त्यांनी म्हटले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारताला विश्वचषक जिंकण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया अन् न्यूझीलंडला सामोरे जावे लागेल, वाचा T20WCचे सुधारित वेळापत्रक
पीएसएलच्या ‘फ्लॉप शो’ नंतर पाकिस्तानचा आणखी एक ‘पीजे’, पीसीबीने केली मोठी घोषणा
आशिया चषकात ‘या’ तीन चुका भारताला पडल्या महागात; जर टाळल्या तर टी-20 विश्वचषक आपलाच!