---Advertisement---

हरभजन सिंग, इरफान पठाणने बुमराहचे असे केले हॅट्रिक क्लबमध्ये वेलकम

On: रविवार, सप्टेंबर 1, 2019 8:56 PM
---Advertisement---

सबिना पार्क, किंग्स्टन येथे वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर वेस्ट इंडीजने पहिल्या डावात 7 बाद 87 धावा केल्या आहेत. दुसऱ्या दिवशी भारताकडून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने 6 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याच्या हॅट्रिकचाही समावेश आहे.

तो कसोटीमध्ये हॅट्रिक घेणारा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी भारताकडून पहिल्यांदा हरभजन सिंगने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2001 मध्ये कोलकताला झालेल्या कसोटीत हॅट्रिक घेतली होती. त्यानंतर 5 वर्षांनी 2006 ला कराची येथे भारत विरुद्ध पाकिस्तान संघात झालेल्या कसोटी सामन्यात इरफान पठाणने हॅट्रिक घेतली होती.

त्यामुळे हरभजन आणि इरफानने हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजांच्या क्लबमध्ये बुमराहचे ट्विट करत स्वागत केले आहे.

हरभजनने ट्विट केले आहे की ‘मस्त बुमराह. तू चांगली गोलंदाजी केली. तूझे हॅट्रिक क्लबमध्ये स्वागत आहे. तूझा खूप अभिमान वाटत आहे. अशीच कामगिरी करत रहा.’

त्याचबरोबर इरफानने ट्विट केले आहे की ‘बुमराह तूझे हॅट्रिक क्लबमध्ये स्वागत आहे.’

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 416 धावा केल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

हनुमा विहारीने या व्यक्तीला केले पहिले शतक समर्पित, पहा व्हिडिओ

बुमराह म्हणतो, विराटमुळे मला हॅट्रिक मिळाली, पहा व्हिडिओ

कसोटी कारकिर्दीत पहिले शतक करताच हनुमा विहारीला मिळाले या दिग्गजांच्या लिस्टमध्ये स्थान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment