असे अनेक खेळाडू असतात, जे मैदानावरील त्यांच्या तापट स्वभाव किंवा आक्रमक खेळासाठी ओळखले जातात. मात्र, त्यातही काही असे खेळाडू असतात, जे मैदानावर एकदम शांत राहण्यासाठी ओळखले जातात. त्याच खेळाडूंमध्ये महेंद्र सिंग धोनी याचाही समावेश होतो. धोनीच्या मैदानावरील शांत स्वभावामुळे त्याला क्रिकेटजगत ‘कॅप्टन कूल’ म्हणते. धोनी खूपच क्वचित वेळा मैदानावर रागावताना दिसला आहे. मात्र, धोनीची एक हळवी बाजूदेखील आहे, जी त्याचा माजी भारतीय आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचा सहकारी हरभजन सिंग याने सांगितली आहे.
स्टार स्पोर्ट्सने शेअर केलेल्या एका व्हिडिओत हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने खुलासा केला. तो म्हणाला की, आयपीएलच्या दोन हंगामात सट्टेबाजी प्रकरणातील त्यांच्या कथित सहभागामुळे चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाला निलंबित केले होते. त्यानंतर सीएसके संघाने 2018मध्ये स्पर्धेत पुनरागमन केले होते.
या व्हिडिओत सीएसकेचा माजी खेळाडू इम्रान ताहिर (Imran Tahir) यानेही हरभजनच्या वक्तव्याला दुजोरा दिला. त्याने सांगितले की, त्यावेळी त्याला समजले होते की, चेन्नई संघ एमएस धोनी (MS Dhoni) याच्या किती जवळ आहे.
हरभजन सिंग म्हणाला की, “एक कहाणी आहे, जी मला सांगावीशी वाटतेय. 2018मध्ये जेव्हा सीएसकेने 2 वर्षांच्या बंदीनंतर स्पर्धेत पुनरागमन केले होते, तेव्हा संघ डिनरसाठी बसला होता. मी ऐकलं होतं की, ‘पुरुष रडत नाहीत.’ मात्र, त्या रात्री एमएस धोनी रडला होता. तो खूपच भावूक झाला होता. मला वाटते की, याबाबत कुणालाही माहिती नसेल. बरोबर इम्रान?”
हरभजनला दुजोरा देत ताहिर म्हणाला की, “हो, नक्कीच. मीदेखील तिथेच होतो. तो एमएस धोनीसाठी खूपच भावूक क्षण होता. त्याला तसे पाहून मला समजले की, हा संघ त्याच्या हृदयाच्या किती जवळ आहे. तो संघाला त्याचे कुटुंबच मानतो. तो आम्हा सर्वांसाठी खूपच भावूक क्षण होता.”
पुढे बोलताना ताहिर म्हणाला की, “आम्ही 2 वर्षांनंतर पुनरागमन केले आणि ट्रॉफी जिंकली. जेव्हा लोकांनी तुमच्या संघाला ‘म्हातारे’ असा टॅग दिला, आणि त्या हंगामातील संघात मीदेखील होतो, पण आम्ही ट्रॉफी जिंकलो. मला त्या किताबाचा खूप अभिमान वाटतो.”
चेन्नई सुपर किंग्ससाठी तो आयपीएलचा तिसरा किताब होता. त्यापूर्वी चेन्नईने 2010 आणि 2011 या सलग दोन हंगामाची ट्रॉफी आपल्या नावावर केली होती. तसेच, त्यानंतर 2021च्या आयपीएल हंगामातही चेन्नईने विजेतेपद पटकावले होते.
https://www.instagram.com/reel/Csk8xmoNNr_/?utm_source=ig_embed&ig_rid=12faec34-563b-495f-b452-9461f1c5368a
आता आयपीएल 2023 स्पर्धेचा पहिला क्वालिफायर सामना मंगळवारी (दि. 23 मे) चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स (Chennai Super Kings vs Gujarat Titans) संघात खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवून चेन्नई संघ थेट अंतिम सामन्यात एन्ट्री करण्याचा प्रयत्न करेल. आता चेन्नई संघ ही कामगिरी करू शकतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Harbhajan Singh on MS Dhoni says he cried that night read here more)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऋतुराज गुजरातविरुद्ध अपयशी ठरावा! ही आकडेवारी पाहून सीएसके फॅन्स असंच म्हणतील
एक दोन नव्हे तब्बल 12 दिग्गजांना धोनीने ठरवले चूक! नक्की काय घडले वाचाच