आयपीएल २०२१ कोरोनामुळे स्थगित झाल्याने राष्ट्रीय संघातील खेळाडू वगळता इतर सर्व खेळाडू आपापल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व करणारा भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग हा देखील सध्या नवनवीन गोष्टी शिकत आहे. त्याने इंस्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला असून यामध्ये तो स्वयंपाक बनवताना दिसतोय. या व्हिडिओला चाहत्यांची पसंती मिळत आहे.
हरभजनने बनविला हा पदार्थ
हरभजन सिंग क्रिकेटपासून दूर असताना आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. सध्या देशभरात लॉकडाऊन असल्याने त्याने स्वयंपाकात हात आजमावून पाहिले. हरभजनने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो सर्वप्रथम कांदा व टोमॅटो कापून गॅसवर ठेवलेल्या भांड्यामध्ये टाकताना दिसतोय. अखेरीस त्याने उत्तर भारतात प्रसिद्ध असलेला छोले हा पदार्थ बनविल्याचे दिसत आहे. या व्हिडिओखाली चाहत्यांनी त्याला ‘शेफ भज्जी’ अशी उपाधी देखील देऊन टाकली.
https://www.instagram.com/reel/CPrxtthh3hW/?utm_medium=copy_link
आयपीएलमध्ये आहे केकेआरचा भाग
हरभजन सिंग स्थगित झालेल्या आयपीएल २०२१ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व करत होता. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या लिलावात त्याला केकेआरने २ कोटी रुपयांच्या आधारभूत किमतीवर विकत घेतले होते. त्याने या हंगामात आतापर्यंत तीन सामने खेळताना केवळ ७ षटके गोलंदाजी केली. मात्र त्याला यादरम्यान एकही बळी मिळवता आला नाही. केकेआर संघाची कामगिरी देखील चांगले झाले नसून ते सात सामन्यात २ विजय मिळवून गुणतालिकेत सातव्या स्थानी आहेत.
भारताचा दिग्गज फिरकीपटू आहे हरभजन
हरभजन सिंग याला २१ व्या शतकातील अव्वल फिरकीपटू म्हणून ओळखले जाते. त्याने भारतासाठी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून ६७८ बळी मिळवले आहेत. तो भारताने जिंकलेल्या २००७ टी२० विश्वचषक व २०११ साली जिंकलेल्या वनडे विश्वचषक संघाचा सदस्य होता. त्याने तीन वेळा मुंबई इंडियन्ससह तर, एकदा चेन्नई सुपर किंग्ससोबत आयपीएलचे जेतेपद देखील जिंकले आहे. त्याचाच नेतृत्वात मुंबई इंडियन्सने चॅम्पियन्स लीग जिंकण्याचा कारनामा केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय खेळाडूंसमोर असेल ‘हे’ आव्हान; इंग्लंडमध्ये असलेल्या विहारीचे वक्तव्य
जिद्द असावी तर अशी! पाकिस्तान टी२० संघात वजनदार फलंदाजाची एंट्री, वर्षभरात घटवलं ३० किलो वजन
विराटपेक्षा रोहित आहे यशस्वी कर्णधार, ‘ही’ आहेत त्यामागची ५ समर्पक कारणे





