बुधवारी, 1 आॅगस्टपासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. हा सामना एजबॅस्टन मैदानावर होत आहे.
या सामन्यासाठी भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने हजेरी लावली आहे. याबद्दल त्याने स्वत: ट्विट करुन याची माहिती दिली.
त्याने ट्विटमध्ये एजबॅस्टन स्टेडियममध्ये उपस्थित असलेले काही फोटो शेअर केले आहेत. तसेच त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की ” एजबॅस्टनवर वेगळ्या भूमीकेत परत येऊन छान वाटले. यावेळी भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी आलो आहे.”
याआधीही हरभजनने इंग्लंड विरुद्ध विंडिज संघात झालेल्या एजबॅस्टन मैदानावरील 50 व्या कसोटी सामन्यासाठीही उपस्थिती लावली होती. तर आज इंग्लंडच्या 1000 व्या कसोटी सामन्यासाठीही तो या मैदानावर हजर आहे. या दोन्ही वेळचे फोटो त्याने शेअर केले आहेत.
Lovely to be back here at #Edgbaston for different role this time.. cheering for Team india 🇮🇳 #EngvInd test series 2018 @BCCI pic.twitter.com/1g5lOl0xMd
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) August 1, 2018
हरभजनने भारताकडून 103 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने 32.46 च्या सरासरीने 417 विकेट घेतल्या आहेत. शिवाय फलंदाजी करताना 2 शतके आणि 9 अर्धशतकांसह 2224 धावाही केल्या आहेत.
त्याचबरोबर हरभजनने इंग्लंडमध्ये 5 कसोटी सामने खेळले असून यात 49.78 च्या सरासरीने 14 विकेट्स घेतल्या आहेत.
मात्र हरभजन एजबॅस्टन मैदानानर एकही कसोटी सामना खेळलेला नाही. त्याने या मैदानावर 2004 मध्ये एकमेव वनडे सामना खेळला आहे. पण त्याला यात एकही विकेट घेता आली नाही.
तसेच हरभजन 2015 पासून भारताच्या कसोटी संघाबाहेर आहे. तो शेवटचा कसोटी सामना श्रीलंका विरुद्ध 12 -15 आॅगस्ट 2015 दरम्यान खेळला होता.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–पहिल्याच कसोटी सामन्यात आर अश्विनचा खास विक्रम
–पहिली कसोटी- इंग्लंडला पहिला धक्का, हा खेळाडू झाला बाद
–पहा व्हिडीओ- या गोलंदाजाने टाकला जगातील सर्वात खराब चेंडू