मुंबई । भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याने केलेल्या ट्विटने खळबळ उडाली आहे. टर्बनेटर आणि भज्जी या नावाने प्रसिद्ध असलेल्या हरभजन सिंगने ट्विटरवर लिहिले आहे की, क्रिकेटविषयीचे अशी काही माहिती मला मिळाली आहे, ज्यामुळे तुमचा खेळ पाहण्याच्या दृष्टीकोनात बदल होईल. त्याचे हे ट्विट थोड्या वेळाने व्हायरल झाले आहे.
तो इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चा फ्रेंचायझी संघ चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे, परंतु त्याने यावर्षी आपले नाव मागे घेतले. त्याचे हे ट्विट लोक फिक्सिंग, घोटाळे आणि फसवणूकीशी संबंधित जोडताना दिसत आहे.
हरभजनने ट्विटरवर लिहिले आहे की, ‘क्रिकेट विषयी बऱ्याच बातम्या येता आहेत आणि मला असे काहीतरी माहित झाले आहे की हा खेळ कायम पाहण्याचा तुमचा दृष्टीकोन बदलेल! # क्रिकेट खुलासा’. हरभजनच्या या ट्विटवर चाहते अनेक प्रकारचे प्रश्न विचारत आहेत, पण सध्या त्याने कोणतेही उत्तर दिले नाही.
Cricket aaj kal kaafi news mein hai, aur abhi abhi mujhe aisa kuch pata chala hai that will change the way you look at cricket forever! #CricketKaKhulasa
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) September 12, 2020
कोविड -१९ मुळे यावर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) आयपीएलचा १३ वा हंगाम खेळला जात आहे. हरभजन सीएसके संघासह दुबईला रवाना झाला नाही, काही दिवसांनी त्याने आयपीएलमधून माघार घेतली.