इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची आंतरराष्ट्रीय वनडे मालिका सुरू झाली आहे. मालिकेच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 19 धावांनी विजय मिळवला. याचबरोबर त्यांनी 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
सामना अटीतटीचा होता आणि शेवटच्या षटकापर्यंत चालला. प्रथम फलंदाजी करणार्या ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 9 बाद 294 धावा केल्या. प्रत्युत्तरात यजमान फक्त 9 बाद 255 धावा करू शकले.
सॅम बिलिंग्जने 110 चेंडूंमध्ये 118 धावांची धडाकेबाज खेळी केली, पण जेव्हा तो तंबूत परतला तेव्हा इंग्लंडच्या विजयाच्या आशा संपल्या. सामन्यादरम्यान एक मजेशीर किस्सा दिसला. क्षेत्ररक्षण करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू मिशेल मार्शला चेंडू शोधण्यासाठी पार्किंग क्षेत्रात जावे लागले.
बिलिंग्जने त्याच्या खेळीदरम्यान 14 चौकार आणि 2 षटकार ठोकले. यातील एक फटका इतका जोरदार होता की चेंडू पार्किंग क्षेत्रात पोहोचला. कोविड-19 या साथीच्या रोगामुळे ही मालिका जैव सुरक्षित वातावरणात आणि रिक्त मैदानावर खेळली जात आहे.
जेव्हा बिलिंग्जने फटका मारला, तेव्हा मिशेल मार्शला चेंडू आणण्यासाठी पार्किंग क्षेत्रात जावे लागले. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
https://twitter.com/CricketFreakz/status/1304655757166559238
क्रिकेटमध्ये यापूर्वी अशे कधीच पाहिले नव्हते जेव्हा क्षेत्ररक्षाकाला चेंडू आणण्यासाठी पार्किंग क्षेत्रात जावे लागले.
या वर्षाच्या सुरुवातीला मार्शने ऑस्ट्रेलिया संघात पुनरागमन केले. त्याने 100 चेंडूत 73 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने ग्लेन मॅक्सवेलबरोबर 126 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. याशिवाय पाच षटकांत 1 बळीही घेतला.
इंग्लंडकडून या सामन्यात बिलिंगशिवाय जॉनी बेअरस्टोने 84 आणि ऑयन मॉर्गनने 23 धावा केल्या. इतर सर्व फलंदजांनी निराशा केली. त्यामुळे इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला. जोश हेजलवूडने 10 षटकांत 26 धावा देऊन तीन बळी घेतले आणि सामनावीर म्हणून त्याची निवड झाली.