श्रीलंका येथे सुरू असलेल्या आशिया चषक 2023 स्पर्धेत रविवारी (10 सप्टेंबर) भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना सुरू झाला. कोलंबो येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल केले गेले. यामध्ये श्रेयस अय्यरच्या जागी केएल राहुल याचा संघात समावेश करण्यात आला. या मुद्द्यावर आता भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पाकिस्तानविरुद्धचा हा सामना सुरू होण्याच्या काही वेळापूर्वी श्रेयस बराच वेळ पुल शॉट मारण्याचा सराव करत असल्याचे सांगण्यात येते. त्याचीही दुखापत किती गंभीर आहे याबाबत अद्याप कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही. या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना हरभजन म्हणाला,
“खेळात दुखापती होत असतात. मात्र, एवढ्या दुखापती होणे हे एकतर तुम्ही दुर्दैवी आहे किंवा तुम्ही केएल राहुलसाठी एक स्थान निर्माण करत आहात. मला वाटते की, अय्यर यावेळी जखमी झाल्याने केएल राहुलसाठी बर्याच गोष्टी योग्य होतील. ही संधी केएल राहुलसाठी मोठे दार उघडेल. केएल राहुलने आपल्या फलंदाजीत स्थिरता आणली. खेळाडू पूर्ण तंदुरुस्त का नाहीत याचे उत्तर एनसीएला द्यावे लागेल. कारण हे सर्वजण दुखापत झाल्यानंतर तेथे पुनर्वसन आणि प्रशिक्षण घेतात.”
अय्यर हा मार्च महिन्यापासून पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. या स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यातून त्याने पुनरागमन केलेले. यामध्ये तो फारसा यशस्वी झालेला नव्हता. तर नेपाळविरुद्ध त्याला फलंदाजीचे संधी मिळाली नव्हती. त्याची दुखापत गंभीर असल्यास आगामी विश्वचषकातून त्याचा पत्ता कट होऊ शकतो.
(Harbhajan Singh Speaks On Shreyas Iyer Injury)
महत्वाच्या बातम्या –
“तुझा शहजादा नवा बुमराह होईल”, बाबा बनलेल्या जस्सीला शाहिनच्या शुभेच्छा, पाहा अप्रतिम व्हिडिओ
आशिया कपमध्ये पाऊस आणि ट्रोल होतायेत जय शाह! काय आहे कारण?