जगभरातील अनेक क्रिकेटपटू क्रिकेटमधील कारकिर्द संपल्यानंतर क्रिकेटपेक्षा वेगळ्या क्षेत्रात पाऊल ठेवतात. अनेकांनी क्रिकेट कारकिर्दीनंतर राजकारण, अभिनय, व्यावसाय अशा वेगवेगळ्या क्षेत्रात स्वत:ला आजमावून पाहिले आहे. यात भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगचाही समावेश आहे. तो भारतीय संघातून मागील अनेक वर्षापासून दूर आहे, या दरम्यान तो अनेकदा टेलिव्हिजनवर झळकला आहे. आता तो एका दाक्षिणात्य चित्रपटात प्रमुख भूमिका निभावताना दिसणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० हून अधिक विकेट्स घेतलेला हरभजन सिंग ‘फ्रेंडशिप’ या तमिळ चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहे. हा चित्रपट तेलुगू आणि हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर १ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे.
या टीझरमधून हरभजनची विविध रुपं चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. तो या टीझरमध्ये डान्स करताना दिसला आहे. तसेच दाक्षिणात्य पद्धतीची लुंगी नेसतानाही दिसत आहे. याबरोबरच तो मारामारी करतानाही दिसत आहे. तसेच मारामारी केल्यानंतर त्याला पोलिसांनी तुरुंगात टाकल्याचेही दिसले आहे. एवढेच नाही तर तो टीझरच्या शेवटी क्रिकेट खेळतानाही दिसला आहे.
पॉल राज आणि सुर्याने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात हरभजन बरोबर अर्जुन आणि तमिळ बिग बॉस फेम लोसिया मारियोनेसन देखील झळकणार आहेत. या चित्रपटाच्या टीझरला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असून हरभजनने या चित्रपटाच्या टीझरची लिंक ट्विट केली आहे.
Sharp,Crisp,Intense #FriendShipMovieTeaser of my Movie is Here.Enjoy it,Guys!
Tamil –https://t.co/LSUImD7xUG
Telugu-https://t.co/unECTwvJK5
Hindi-https://t.co/BSzIWz05iG@JPRJOHN1 @akarjunofficial @shamsuryastepup #Losliya @actorsathish @JSKfilmcorp @ImSaravanan_P
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) March 1, 2021
त्याच्याबरोबरच भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने देखील या चित्रपटाचे आणि हरभजनचे कौतुक करत टीझरची लिंक ट्विट केली आहे. तसेच त्याने या चित्रपटासाठी शुभच्छाही दिल्या आहेत.
This is epic Bhajju pa @harbhajan_singh. Can’t wait to watch the entire movie. Wishing you lots of success with this new endeavour.#FriendShipMovieTeaser 👇
Tamil –https://t.co/oJYZZOnmKp
Telugu-https://t.co/zWrdy6hESt
Hindi-https://t.co/HkxCyyAOZj— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) March 1, 2021
खरंतर फ्रेंडशिप चित्रपट मागीलवर्षीच प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनाच्या संकटामुळे हा चित्रपट लांबणीवर पडला. आता अशी चर्चा आहे की या वर्षाच्या अखेरीसपर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
हरभजन सिंग करणार केकेआरचे प्रतिनिधित्व
हरभजन सिंग जरी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटपासून दूर असला तरी तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. हरभजनने २०१८ आणि २०१९ या दोन वर्षी चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच मागील वर्षी देखील तो चेन्नईचा भाग होता, पण त्याने मागीलवर्षी आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानंतर २०२१ सालच्या आयपीएल लिलावाआधी चेन्नईने त्याला संघातून मुक्त केले होते. त्यामुळे हरभजन लिलावात उतरला होता. त्याला यंदाच्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने खरेदी केले आहे. त्यामुळे यावेळी तो केकेआरचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे.
या चित्रपटांमध्ये हरभजनने केले आहे काम
हरभजन दाक्षिणात्य चित्रपटात जरी पदार्पण करत असला तरी याआधी तो काही हिंदी आणि पंजाबी चित्रपटात झळकला आहे. यात ‘मुझसे शादी करोगी’, सेकंडहँड हजबंड या हिंदी तर ‘भज्जी इन प्रॉब्लेम’ या पंजाबी चित्रपटांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीला खेळताना पहायचं आहे? ‘या’ दिवशी करतोय मैदानात पुनरागमन
भारताविरुद्ध सलग दोन पराभवांनंतर चौथ्या कसोटीआधी इंग्लंड संघात झाले ३ मोठे बदल