---Advertisement---

हरभजनचे रुपेरी पडद्यावरील पदार्पण पाहून पत्नी गीता बासराने दिली मजेशीर प्रतिक्रिया, म्हणाली “आजकाल प्रत्येकाला हिरो…”

On: मंगळवार, मार्च 2, 2021 9:15 PM
---Advertisement---

क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फिरकी गोलंदाजीने त्रिफळा उडवणारा भारतीय गोलंदाज हरभजन सिंग आता मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाच्या कौशल्याने सर्वांच्या मनावर राज्य करण्यासाठी सज्ज झाला आहे. हरभजन सिंग लवकरच दाक्षिणात्य चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला आहे. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. तसेच हरभजन सिंगच्या पत्नीने देखील ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

यापूर्वी देखील अनेक असे क्रिकेटपटू होऊन गेले ज्यांनी क्रिकेटनंतर चित्रपटात आपले नशीब आजमावले. अशातच हरभजन सिंग देखील सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. सोमवारी (१मार्च) त्याचा नवीन येणारा चित्रपट ‘फ्रेंडशिप’चा टिजर लाँच करण्यात आला. हा चित्रपट तमिळ भाषिक आहे. यात तो मुख्य भुमिका बजावणार आहे. हा टीजर त्याने ट्विटरवर शेअर देखील केला आहे. यानंतर अनेक क्रिकेटपटूनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. आणि टीजर शेअर करत आपल्या प्रतिक्रीया देखील नोंदवल्या आहेत.

हरभजन सिंगची पत्नी गीता बसरा हिने देखील टीजर पाहिल्यानंतर ट्विट मध्ये आपली प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, “हे घ्या…आजकाल प्रत्येकाला हिरो बनायचे आहे. कधी विचार नव्हता केला की, हरभजन सिंगला या भूमिकेत पहायची संधी मिळेल. या चित्रपटाची मी आतुरतेने वाट पाहत आहे. फ्रेंडशिप चित्रपटाचा टीजर इकडे आहे. एन्जॉय करा”, असे ट्विट करत गीताने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

https://twitter.com/Geeta_Basra/status/1366430802532204546

गीता बसरा ही देखील एक सीनेअभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने इमरान हाश्मी सोबत काम केले आहे. तिने आपल्या बॉलिवुड कारकिर्दीची सुरुवात इमरान हाश्मी सोबत ‘दिल दिया हैं से ‘ या चित्रपटातून केली होती. त्यांनतर ती पुन्हा ‘ द ट्रेन ‘ या चित्रपटात झळकली होती. तिचे इमरान हाश्मी सोबत असलेले ‘ओ अजनबी’ हे गीत खूप प्रसिद्ध झाले होते.

महत्वाच्या बातम्या:

आयसीसी वनडे क्रमवारी : स्मृती मंधानाची घसरण, तर झुलन गोस्वामी-मिताली राज अव्वल दहामध्ये कायम

बजरंग पुनिया घेतोय सोशल मीडियापासून ब्रेक, हे आहे कारण

चौथ्या कसोटी सामन्यात रोहित-शुबमनलाच मिळणार का सलामीला संधी? हे आहेत भारतीय संघासमोरील पर्याय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---