युएईमध्ये येत्या १९ सप्टेंबर पासून इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने रंगणार आहेत. ही स्पर्धा संपल्यानंतर १९ ऑक्टोबर पासून ते १४ नोव्हेंबर दरम्यान युएई आणि ओमानमध्ये टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघ कसून सराव करत आहे. तसेच बीसीसीआयने ही आगामी टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी बुधवारी (८ सप्टेंबर) १५ सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. हा संघ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असेल. दरम्यान भारतीय फिरकीपटू हरभजन सिंगने ही भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत, तसेच निराशा देखील व्यक्त केले आहे.
आगामी टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी १५ सदस्यीय खेळाडूंच्या संघात अशा काही खेळाडूंना संधी देण्यात आली आहे, ज्यामुळे क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसेच असेही काही खेळाडू आहेत, जे संघात स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार होते, परंतु त्यांना या संघातून वगळण्यात आले आहे. भारतीय संघातील अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि शिखर धवन यांना या संघात स्थान देण्यात आले नाहीये. ज्यामुळे हरभजन सिंगने दुःख व्यक्त केले आहे.
हरभजन सिंगने टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी संघाची निवड झाल्यानंतर म्हटले की,”विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन. मला युजवेंद्र चहल व शिखर धवनची निवड न झाल्याचे दु:ख आहे. त्यांनी टी- २० मध्ये नक्कीच सातत्यपुर्ण कामगिरी केली होती. युजवेंद्रने दुबई, शारजाह व अबुधाबीमध्ये झालेल्या गेल्या आयपीएल स्पर्धेत २१ गडी बाद केले होते. तो भारताकडून टी-२० मध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे.”
Congratulations everyone who got selected in team India for T20 World Cup.feel bad for @SDhawan25 and @yuzi_chahal they r consistent in this shorter format.Yuzi took 21 wickets in last IPL in dubai/Abudhabi/Sarjan He is all time highest wicket taker for INDIA in T20 #T20WorldCup
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) September 8, 2021
भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर असताना, शिखर धवनला संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. या मालिकेत तो चांगल्याच फॉर्ममध्ये होता. तसेच त्याने आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्या दप्प्यात देखील अप्रतिम फलंदाजी केली होती. तर युजवेंद्र चहलने देखील श्रीलंका दौऱ्यावर चांगली कामगिरी केली होती. तसेच त्याने भारतीय संघासाठी ४९ टी -२० सामन्यात ६३ गडी बाद केले आहेत. भारतीय संघात फिरकी गोलंदाज म्हणून राहुल चाहर, आर अश्विन, अक्षर पटेल आणि वरूण चक्रवर्ती यांना संधी देण्यात आली आहे. तसेच रवींद्र जडेजा अष्टपैलू फिरकी गोलंदाज म्हणून असेल.
टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ : – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह , भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
राखीव खेळाडू – श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर
महत्त्वाच्या बातम्या –
एमएस धोनीला मेंटर केल्यानंतर सुनील गावसकरांना आनंदाबरोबर सतावतेय ‘या’ गोष्टीची चिंता
टी२० विश्वचषकासाठी ‘या’ ३ खेळाडूंची भारतीय संघात निवड होण्यामागे विराट-शास्त्रींचा हात?
टी२० विश्वचषकासाठी ‘या’ ३ खेळाडूंची भारतीय संघातील निवड ठरली ‘सरप्राईज एन्ट्री’