India vs Pakistan: वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स (World Championship of Legends – WCL) मध्ये 20 जुलै रोजी इंडिया चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यात सामना खेळला जाणार आहे. भारत-पाकिस्तान व्यतिरिक्त या टूर्नामेंटमध्ये वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचे संघही भाग घेत आहेत. टूर्नामेंटचा हा दुसरा सीझन खेळला जात आहे. भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी काही भारतीय खेळाडूंनी आपले नाव मागे घेतले आहे. (WCL India Pakistan match)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून आपले नाव मागे घेतले आहे. हरभजन सिंग गेल्या सीझनमध्येही इंडिया चॅम्पियन्सचा भाग होता. पण यावेळी दिग्गज खेळाडूने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला आहे. रिपोर्ट्सनुसार राजकीय कारणांमुळे हरभजन सिंगने WCL मधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला आहे. (Harbhajan Singh WCL)
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान प्रथमच आमने-सामने येणार आहेत. (Pahalgam attack cricket) पण सामन्यापूर्वी हरभजनशिवाय इरफान पठान आणि युसूफ पठान यांनीही पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळण्यास नकार दिला आहे. (Pathan brothers vs Pakistan)
🚨 𝑹𝑬𝑷𝑶𝑹𝑻𝑺 🚨
— Sportskeeda (@Sportskeeda) July 19, 2025
Harbhajan Singh, Yusuf Pathan, and Irfan Pathan have pulled out of the upcoming WCL clash against Pakistan on Sunday. #WCL2025 #INDvPAK #Cricket #Sportskeeda pic.twitter.com/LDiWuzImYo
WCL 2025 साठी संघ-
इंडिया चॅम्पियन्स संघ: युवराज सिंग (कर्णधार), शिखर धवन, हरभजन सिंग, सुरेश रैना, इरफान पठान, युसूफ पठान, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, पीयूष चावला, स्टुअर्ट बिन्नी, वरुण ॲरॉन, विनय कुमार, अभिमन्यू मिथुन, सिद्धार्थ कौल, गुरकीरत मान (India Champions squad)
पाकिस्तान चॅम्पियन्स संघ- मोहम्मद हफीज, शोएब मलिक, सरफराज अहमद, शरजील खान, वहाब रियाज, आसिफ अली, शाहिद आफ्रिदी, कामरान अकमल, आमेर यामीन, सोहेल खान, सोहेल तनवीर (Pakistan Champions team)
🚨 NO HARBHAJAN SINGH vs PAKISTAN IN WCL 🚨
— Johns. (@CricCrazyJohns) July 19, 2025
Harbhajan Singh has Boycotted the match against Pakistan in WCL due to Political reasons. pic.twitter.com/tYNjf7caCj






