---Advertisement---

हरभजन सिंहने निवडली आशिया कप 2025 साठी भारतीय टीम; ‘या’ खेळाडूंना मिळणार संधी

On: शनिवार, ऑगस्ट 16, 2025 8:11 AM
---Advertisement---

आशिया कप 2025 साठी भारतीय संघाची निवड कोणती असेल याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. याआधीच माजी स्पिनर आणि 2 वेळा वर्ल्ड कप चॅंपीयन हरभजन सिंहने आपली ड्रिम टीम निवडली आहे. त्यांनी काही नियमित खेळाडूंना वगळत अनेक नवी नावं सुचवली आहेत. सर्वात मोठं म्हणजे त्यांनी संजू सॅमसन, रिंकू सिंग आणि तिलक वर्मा यांना संघाबाहेर ठेवत सूर्यकुमार यादवला कर्णधारपद कायम ठेवावे असा सल्ला दिला आहे.

हरभजनच्या संघात शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि यशस्वी जायसवाल यांचा समावेश करण्यात आला आहे. पण सर्वात चर्चेचं नाव म्हणजे ऋषभ पंत. त्यांच्या निवडीसाठी सॅमसनला संघाबाहेर करावं लागलं. हरभजनच्या मते विकेटकीपर म्हणून के एल राहूल किंवा ऋषभ पंत यापैकी कुणीही असावं. वेगवान गोलंदाजीत त्यांनी मोहम्मद सिराजला हर्षित राणा आणि मोहम्मद शमीपेक्षा वर मान दिला. तसंच रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांसारखे ऑलराउंडरही निवडले आहेत.

त्यांच्या संघातली यादी अशी आहे – यशस्वी जायसवाल, अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, के एल राहूल/ऋषभ पंत, रियान पराग, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग. भज्जीनं खासकरून शुभमन गिलला सपोर्ट केला आणि म्हटलं की तो मोठ्या इनिंग खेळून T20 मध्येही प्रभाव टाकू शकतो. भारताचा आशिया कप मोहीम 10 सप्टेंबरला UAE विरुद्ध सुरू होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---