---Advertisement---

‘ए फिक्सर चल निघ इथून’; हरभजनने काढले आमीरच्या अब्रूचे धिंडवडे; वाचा संपूर्ण प्रकरण

On: बुधवार, ऑक्टोबर 27, 2021 7:49 AM
---Advertisement---

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना खेळला जाऊन तीन दिवस उलटले आहेत. तरीही माजी खेळाडूंमधील शीतयुद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. भारताचा वरिष्ठ फिरकीपटू हरभजनसिंग व पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांच्यातील ट्विटर वॉरमध्ये नाक खूपसणाऱ्या मोहम्मद आमीर याच्यावर हरभजनने चांगलेच शरसंधान साधले. त्याने केलेल्या ट्विटमुळे आता आमीरची चांगलीच बोलती बंद झाली आहे.

अख्तर हरभजन होता वाद
भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी हरभजनसिंग व शोएब अख्तर यांच्या दरम्यान सामन्याचे निकालावरून खडाजंगी झाली होती. हरभजनने विश्वचषकातील भारताची कामगिरी पाहता पाकिस्तानला हा सामना न खेळता भारताला वॉक ओव्हर देण्याचा सल्ला दिला होता. मात्र, भारताने सामना गमावल्यानंतर अख्तरने हरभजनला काही टोमणे मारले होते.

हरभजन अख्तरच्या वादात पडला होता आमिर
हरभजन आणि अख्तर यांच्या वादात मोहम्मद आमीर यानेदेखील उडी घेतली होती. त्याने ट्विट करत लिहिलेले,
‘सगळे कसे आहात? तुम्हाला हे विचारायचे होते की हरभजन पाजी तुम्ही टीव्ही तर तोडला नाही ना? जाऊद्या शेवटी हा क्रिकेटचा शानदार खेळ होता.’

https://twitter.com/iamamirofficial/status/1452536740724592646?t=rAiq6PYm5mPVulOsPrvKSg&s=19

हरभजनने दिलेले उत्तर
आमीरच्या ट्विटला उत्तर देताना हरभजनने लिहिले,
‘आमीर तुझ्यासारख्या लोकांना फक्त पैसा हवा असतो. काही इज्जत ना काही फक्त पैसा. देशवासियांना सांगणार नाहीस का किती पैसे मिळाले होते. क्रिकेटला बदनाम करणाऱ्या तुझ्यासारखा लोकांवर बोलायची इच्छा होत नाही.’

यासोबतच हरभजनने २०१० अशिया कप चषकातील एक व्हिडीओ शेअर केला ज्यामध्ये हरभजनने आमीरच्या गोलंदाजीवर षटकार खेचला होता. त्याला कॅप्शन देताना त्याने लिहिले,
‘फिक्सर आहेस फिक्सर. चल निघ इथून’  या सामन्यात हरभजनने अख्तर व आमीर यांच्या गोलंदाजीवर हल्ला चढवत भारताला विजय मिळवून दिला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---