हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने टी-20 मालिका जिंकली. या मालिकेतील पहिला सामना एकही चेंडू न टाकता रद्द केला गेला होता. दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने 65 धावांनी विजय मिळवला, तर मालिकेतील तिसऱ्या सामना बरोबरीवर सुटला होता. या मालिकनंतर भारताने न्यूझीलंडसोबत एकदिवसीय मालिका खेळली, पण हार्दिक या मालिकेदरम्यान विश्रांतीवर होता. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओवरून एक गोष्ट समजते ती म्हणजे, तो सुट्यांचा पूर्ण आनंद घेत आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिका हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील भारतीय संघ 0-1 अशा अंतराने जिंकला. पण एकदिवसीय मालिकेत शखर धवन (Shikhar Dhawan) याच्या नेतृत्वातील संघ मात्र पराभूत झाला. एकदिवसीय मालिकेतील देखील दोन सामने पावसामुळे रद्द झाले आणि मालिका 1-0 अशा अंतराने न्यूझीलंडच्या नावावर झाली. भारतीय संघाच्या आगामी बांगलादेश दौऱ्यात देखील हार्दिक पंड्या (Hardik Pandya) विश्रांतीवर असणार आहे. त्याने हा मोकळा वेळ पूर्णपणे कुटुंबासाठी दिल्याचे दिसत आहे.
हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक (Natasha Stankovic) यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओत दोघेजण डान्स स्टेप्स करताना दिसत आहेत. नताशा हार्दिकला डान्स स्टेप्स शिकवत आहे आणि हार्दिक देखील स्टेप्स जसेच्या तशा करण्याच्या प्रयत्नात आहे. असे असले तरी, हार्दिक या स्टेप्स करताना चुकत आहे आणि याच कारणास्तव चाहते त्याची फिरकी देखील घेत आहेत. व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेच. पण सोबतच त्यावर चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया देखील पाहायला मिळत आहेत. काहीजण हार्दिकला बायकोच्या इशाऱ्यावर नाचणारा म्हणत आहेत, तर काहीजण त्याला गरभा खेळायला सांगत आहेत.
https://www.instagram.com/reel/CllFYPcDtIq/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, हार्दिक पंड्या आणि नताशा स्टेनकोविक मोठा काळ एकमेकांना डेट करत होते. पुढे 2020 मध्ये या दोघांनी स्वतःचे प्रेमसंबंध लग्नात बदलले. यावर्षी त्यांना एक मुलगा देखील झाला, ज्याचे नाव अगस्त्य असे ठेवले गेले आहे. नताशा 2019 मध्ये सर्वात आधी ‘नच बलिए’ या कार्यक्रमात दिसली होती आणि इथूनच दिला तिला प्रसिद्ध मिळायला सुरुवात देखील झाली. (Hardik Pandya and Natasha Stankovic’s dance is going viral)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेेत ‘या’ खेळाडूंनी जिंकले शास्त्रींचे मन, माजी प्रशिक्षकांकडून स्तुतीसुमनांचा वर्षाव
‘एवढ्या लवकर तुलना कशी करू शकता…’, हर्षा भोगलेंना रिषभ पंतचे प्रत्युत्तर