इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स संघाने शानदार कामगिरी केली आहे. त्यांनी आत्तापर्यंत ९ सामन्यांपैकी ८ सामने जिंकले आहेत. त्यामुळे गुजरात टायटन्स संघ गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आहे. त्यांनी शनिवारी रॉयल चॅलेजंर्स बेंगलोर विरुद्ध ६ विकेट्सने विजय मिळवला. हा सामना हार्जिकचा आयपीएलमधील १०० वा सामना होता. त्यामुळे हार्दिक या सामन्यानंतर भावूक झाला होता.
हार्दिकची भावूक पोस्ट
हार्दिकला (Hardik Pandya) आयपीएलमधील १०० व्या सामन्यात (100th IPL Matches) विजय मिळल्याने आनंद झाला आहे. त्याने हा विजय गुजरातमधील लोकांना समर्पित केला आहे. त्याने ट्वीट करत लिहिले की, ‘हा विजय मी गुजरातच्या लोकांना समर्पित करतो. गुजरात दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. १०० आयपीएल सामन्याबद्दल तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. पहिला आयपीएल सामना खेळणारा मुलगा ते १०० व्या आयपीएल सामन्यात नेतृत्व करण्यापर्यंतचा प्रवास स्वप्न पूर्ण करणारा होता. तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा.’
Dedicating this win to the people of Gujarat ❤️ Gujarat Divas ni Hardik Shubhechha 😊 Grateful for your wishes on reaching 100 IPL games. From a kid playing his 1st IPL match in 2015 to captaining a team in my 100th it’s a dream come true. Believe in the power of your dreams 🧿❤️ pic.twitter.com/4grqugohsk
— hardik pandya (@hardikpandya7) May 1, 2022
हार्दिकने मुंबईकडून केलेले पदार्पण
हार्दिकने आयपीएलमध्ये २०१५ साली पदार्पण केले होते. त्याने मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले होते. त्याने आत्तापर्यंच्या त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वाधिक वेळ मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. त्याने २०१५ ते २०२१ पर्यंत मुंबई इंडियन्सकडून आयपीएल खेळले. त्यानंतर मुंबईने त्याला आयपीएल २०२२ हंगामापूर्वी मुक्त केले. त्यामुळे गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) त्याला १५ कोटी रुपयांमध्ये संघात स्थान दिले आणि संघाचे कर्णधारपद पण सोपवले.
हार्दिकची आयपीएलच्या १५ व्या हंगामात दमदार कामगिरी
हार्दिकने आयपीएलच्या १५ व्या हंगामात (IPL 2022) आत्तापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. त्याने १५ व्या हंगामात ८ सामन्यांत आत्तापर्यंत ५१.३३ च्या सरासरीने ३०८ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ३ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने या हंगामात गोलंदाजी केली असून ४ विकेट्स घेतल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
लतितने रोखले राहुलचे तिसरे शतक; स्पायडरमॅन बनून यादवने घेतला शानदार झेल
मार्शची प्रामाणिकता दिल्लीला पडली महागात अन् गमावला सामना? वाचा नक्की काय झालं