भारतीय क्रिकेट संघ या वर्षाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात ३ कसोटी, ३ वनडे आणि ४ टी२० सामन्यांच्या मालिका होणार आहेत. मात्र, या दौऱ्यासाठी हार्दिक पंड्याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह आहे. हार्दिक पंड्याला नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेतून वगळण्यात आले होते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील सामन्यांना १७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.
माधम्यांतील वृत्तानुसार बीसीसीआयची आणि निवड समीतीची इच्छा आहे की हार्दिकने राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, बंगळुरू येथे जाऊन स्वत:ची तंदुरुस्ती सिद्ध करावी.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इनसाईड स्पोर्ट्सला माहिती दिली आहे की, हार्दिकची तंदुरुस्ती आरामावर अवलंबून आहे. तो लवकरच एनसीएमध्ये जाईल आणि त्याच्या तंदुरुस्तीकडे पाहून त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संधी द्यायची की नाही हे ठरवले जाईल.
याबरोबरच ८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्येही हार्दिक खेळणार की नाही हे पाहावे लागणार आहे. याबद्दल बीसीसीआयचे अधिकारी म्हणाले, त्याच्या तंदुरुस्तीवरच हे अवलंबून आहे. पण, सध्या त्याने स्वत:ला तंदुरुस्त ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. हे असे निर्णय आहे, जे तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्यानंतरच घ्यायला हवेत, सध्या असे नाहीये.
हार्दिक करतोय संघर्ष
हार्दिक गेल्या २ वर्षांपासून त्याच्या तंदुरुस्तीबाबत संघर्ष करत आहे. दोन वर्षांपूर्वी त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. ज्यानंतर तो फारसा गोलंदाजी करताना दिसला नाही. त्याच्या पाठिच्या दुखापतीमुळे त्याला अपेक्षेप्रमाणे गोलंदाजी करता येत नाहीय, असेच गेल्या २ वर्षांत दिसून आले आहे. त्याचबरोबर त्याचा फलंदाजीतही फारसा चांगला फॉर्म दिसलेला नाही.
नुकत्याच झालेल्या आयपीएल २०२१ आणि टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत हार्दिक मोठी कामगिरी करण्यास अपयशी ठरल्याचे दिसले आहे. हार्दिकने २०२०पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७ सामने खेळताना १ अर्धशतकासह केवळ २८४ धावा केल्या आहेत. तसेच ६ विकेट्स घेतल्या आहेत.
त्याचबरोबर अधिकाऱ्यांनी हे पण सांगितले की, हार्दिक कसोटी क्रिकेटसाठी तितका तंदुरुस्त सध्या नाही. त्याला यासाठी अजून वेळ पाहिजे आणि आम्ही घाई करणार नाही. जर तो तयार असेल तर त्याला वनडे आणि टी२० मालिकेसाठी पाठवले जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच पसरले भीतीचे वातावरण! श्रीलंकेच्या ३ खेळाडूंना झाली कोरोनाची लागण
न्यूझीलंडचा ३-० ने धुव्वा उडवण्यात ‘या’ ५ भारतीय खेळाडूंनी बजावली मोलाची भूमिका
जर्मनीच्या झ्वेरेवने जिंकले दुसऱ्यांदा एटीपी फायनल्सचे विजेतेपद, अंतिम सामन्यात मेदवेदेव पराभूत