---Advertisement---

संकटमोचक पांड्या ! शतकवीर स्मिथला तंबूत धाडत हार्दिकचे जोरदार पुनरागमन

On: रविवार, नोव्हेंबर 29, 2020 12:28 PM
---Advertisement---

सिडनी। रविवारी(२९ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात दुसरा वनडे सामना झाला. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पार पडलेल्या या सामन्यात हार्दिक पंड्याने गोलंदाज म्हणून पुनरागमन केले आहे. विशेष म्हणजे त्याने गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाकडून शतकी खेळी करणाऱ्या स्टिव्ह स्मिथची विकेटही घेतली.

या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाज भारतीय गोलंदाजांवर भारी पडत होते. त्यात स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लॅब्यूशाने यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली होती. ही भागीदारी तोडणे कठीण वाटत असतानाच हार्दिक गोलंदाजीसाठी आला आणि त्याने डावाच्या ४२ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर १०४ धावांवर खेळणाऱ्या स्मिथला बाद केले. स्मिथचा झेल मोहम्मद शमीने घेतला.

“मला माहित नाही मी कधी गोलंदाजी करेल” – हार्दिक पंड्या 

या सामन्यात हार्दिकला गोलंदाजी करताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटले कारण त्याने शुक्रवारी(२७ नोव्हेंबर) म्हटले होते की तो गोलंदाजी कधी करेल हे माहित नाही. सध्या तो आंतरराष्ट्रीय सामन्यात गोलंदाजी करण्यास सज्ज नाही.

मागील १ वर्षापासून केली नव्हती गोलंदाजी –

हार्दिकच्या पाठीवर मागीलवर्षी ऑक्टोबरमध्ये शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे त्याने मागील १ वर्षापासून गोलंदाजी केली नव्हती. ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी पार पडलेल्या आयपीएलमध्येही तो गोलंदाजी करताना दिसला नव्हता.

महत्त्वाच्या बातम्या –

दुसऱ्या वनडे दरम्यान मैदानातच फिंच- केएल राहुलची मस्ती, पाहा व्हिडिओ

भारताने ९८८ वनडे सामने खेळले, पण ‘असा’ नकोसा विक्रम पहिल्यांदाच झाला

अफलातून! दुसऱ्या टी२० सामन्यात न्यूझीलंडच्या २३ वर्षीय फलंदाजाने शतकी खेळीसह केला भारी रेकॉर्ड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---