---Advertisement---

हार्दिक पंड्याकडून पाकिस्तानच्या ‘या’ १७ वर्षीय क्रिकेटरला मिळाली बॅट भेट

On: गुरूवार, एप्रिल 1, 2021 12:39 AM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 2 एप्रिल 2021 रोजी खेळला जाणार आहे. पाकिस्तानचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन एकदिवसीय आणि चार टी -20 सामने खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू तबरेज शमसीने निर्माण केलेल्या दबदब्याबद्दल पाकिस्तान संघ व्यवस्थापनाला माहिती आहे. म्हणून पाकिस्तान संघ व्यवस्थापनाने या मालिकेच्या अगोदर 17 वर्षीय फिरकीपटू फैसल अक्रमला आपल्या प्रशिक्षण शिबिरात गोलंदाजी करण्यासाठी सामील केले आहे.

विशेष म्हणजे फैसलला भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याची बॅट भेट म्हणून मिळाली आहे, हे वाचून बर्‍याच क्रिकेट चाहत्यांना आश्चर्य वाटेल. पण हे खरे आहे. याबद्दल फैसल अक्रम म्हणाला की, “मी इन्स्टाग्रामवर हार्दिकशी बोललो आहे. भारतात त्याने माझ्यासाठी बॅटचे प्रायोजन केले आहे.”

‘पाकिस्तान क्रिकेट’ या पाकिस्तानी सांकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले की, त्याला फलंदाजीचे कौशल्यही विकसित करायचे आहे. त्याला अष्टपैलू म्हणून ओळखले जावे, अशी त्याची इच्छा आहे. ही प्रेरणा त्याला पंड्याकडूनही मिळाली असावी. तसेच त्याने म्हटले आहे की, “मी माझ्या फलंदाजीवर कठोर परिश्रम करत आहे. मी आक्रमक फटकेबाजी देखील करू शकतो, त्यामुळे अष्टपैलू म्हणून पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व करणे हे माझे ध्येय आहे.”

त्याच्या कारकीर्दीबद्दल सांगायचे म्हटले तर तो पीएसएलमध्ये मुल्तान सुल्तानकडून खेळला आहे. त्याने सकलिन मुश्ताक आणि शाहिद आफ्रिदी यांच्यासोबत खेळण्याविषयी बोलताना म्हटले आहे की, “मुश्ताक माझा आवडता प्रशिक्षक आहे आणि तो लेगस्पिनर देखील आहे, म्हणून मी त्याच्याकडून बरेच काही शिकलो आहे. शाहिदने मला बरेच काही शिकवले आणि आत्मविश्वास दिला. त्याने मला फक्त माझ्याकडून सर्वोत्तम देण्यास सांगितले, जेणेकरून दक्षिण आफ्रिका दौर्‍यापूर्वी पाकिस्तानच्या फलंदाजांचा चांगला सराव होऊ शकेल. तसेच त्याला गोलंदाजी करूनही मी अनुभव मिळविला.”

आतापर्यंतच्या कारकीर्दीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे फैसलने बाबर आजमची घेतलेली विकेट. त्याने ही विकेट नुकत्याच पाकिस्तानमधील सराव सामन्यादरम्यान घेतली होती. बाबर आझमची विकेट घेतल्यानंतर अक्रमने विराट कोहलीची विकेट घेण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

तो म्हणाला की, “विराट कोहलीची विकेट मिळवण्याचे माझे स्वप्न आहे आणि आशा आहे की ते माझे स्वप्न पूर्ण होईल. परंतु माझे आत्ताचे ध्येय पाकिस्तानकडून 19 वर्षाखालील विश्वचषक खेळणे आहे. या आगामी दौर्‍यात मी सर्वोत्कृष्ट गोलंदाज होण्याचा प्रयत्न करणार आहे.”

महत्त्वाच्या बातम्या –

वनक्कम चेन्नई! मुंबई इंडियन्स चेन्नईत पोहचताच रोहितचे तमिळ भाषेत अभिवादन, पाहा व्हिडिओ

यंदा केकेआर आयपीएल विजेतेपद जिंकणार का? शाहरुख खानने दिले भन्नाट उत्तर

IPL 2021: धोनीच्या चेन्नईविरुद्ध पहिलाच सामना खेळताना ‘कर्णधार’ रिषभ पंतच्या नावावर होणार ‘हा’ मोठा रेकॉर्ड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---