नुकतीच भारत विरुद्ध आयर्लंड या दोन संघात २ टी२० सामन्यांची मालिका संपन्न झाली. या मालिकेच्या वेळीच भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असल्याने मालिकेत अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली होती. शिवाय संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्याच्या खांद्यावर होते. भारताना पंड्याच्या नेतृत्वात ही मालिका २-०ने जिंकली. मात्र, मालिका विजयापेक्षा सध्या हार्दिकने मालिका विजयानंतर केलेल्या कृत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हार्दिकने या मालिकेत भारताचे नेतृत्व सक्षमपणे केले. मालिकेपूर्वी त्याने आपल्याला कर्णधारपदाचे धडे भारताचा माजी दिग्गज कर्णधार आणि संपूर्ण जगात कॅप्टन कूल नावाने प्रसिद्ध असणाऱ्या महेंद्रसिंग धोनी कडून मिळाले असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, मालिका जिंकल्यानंतर पंड्याने हे त्याच्या कृतीतून दर्शवले. मालिका विजयाचा चषक हातात येताच त्याने चषक थेट संघातील सर्वात युवा असणाऱ्या उमरान मलिककडे सोपावला. पंड्याच्या या गोष्टीमुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Captain Hardik Pandya has handed over the trophy to Umran Malik. Such a beautiful picture ❤️#UmranMalik #HardikPandya pic.twitter.com/XA5hbKPhsI
— Abdullah Neaz (@cric___guy) June 28, 2022
या आधी भारतीय संघात ही परंपरा सर्वात आधी महेंद्रसिंग धोनीने सुरू केली होती. प्रत्येक मालिका किंवा स्पर्धा जिंकल्यानंतर धोनी विजयाचे प्रतिक असणारा चषक संघातील युवा किंवा विजयाचा शिल्पकार असणाऱ्या खेळाडूच्या हातात देऊन स्वत: एखाद्या कोपऱ्यात जाऊन शांत स्वभावाने विजयाचा जल्लोष साजरा करायचा. हार्दिकनेही असेच काहीसे करून सर्वांची मने जिंकली आहेत.
दरम्यान, आयर्लंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या दोन टी२० सामन्यांतील पहिल्ंया सामन्यात पावसाने मोडता घातल्याने सामना केवळ १२-१२ षटकांचा खेळवण्यात आला. त्या सामन्यात भारताने एकतर्फी खिंड लढवत विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात मात्र, भारतीय फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करत २० षटकांत तब्बल २२५ धावांचे लक्ष्य उभारले. या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंड संघाने उत्तम प्रदर्शन केले मात्र, शेवटू ते केवळ ४ धावांनी पिछाडीवर पडले आणि भारताने दुसऱ्या सामनम्यात देखील विजय नोंदवला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
मागच्या सात वर्षांपासून रखडलेली गोष्ट सॅमसनने आयर्लंडविरुद्ध केली पूर्ण, वाचा सविस्तर
दीपक हुड्डा आणि संजू सॅमसनच्या वादळाने उध्वस्त केले सारेच विक्रम, नावावर केला टी२०तील वर्ल्ड रेकॉर्ड
अफलातून! आजवर ११ हजार टी२० खेळल्या गेल्या, पण ‘ही’ अद्भुत कामगिरी करणारा भारतीय संघ पहिलाच






