भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना मंगळवारी (8 डिसेंबर) पार पडला. भारताला या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा व्हाईट वॉश टळला. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर टी20 मालिका जिंकण्यात भारताला यश आले. या विजयानंतर टी20 मालिकेत मोलाची कामगिरी बजावणारा भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने आपल्या मुलाबद्दल महत्त्वाचे विधान केले आहे.
“चार महिन्यांपासून मुलाला पहिले नाही, म्हणून…”
सामना संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना पंड्या भावूक होऊन म्हणाला की, “चार महिन्यांपासून मी माझ्या मुलाला पाहिले नाही, म्हणून मला कुटुंबासमवेत थोडा वेळ घालवायचा आहे.”
कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी परत येण्याच्या प्रश्नावर हार्दिकची प्रतिक्रिया
ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत पंड्या भारतीय संघाचा भाग नाही. जेव्हा त्याला विचारण्यात आले की, तो लवकरच कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी परत येईल का? या प्रश्नाचे उत्तर देताना पंड्या म्हणाला की, “कदाचित भविष्यात असं होऊ शकतं, परंतु याबद्दल आता मला कल्पना नाही.”
“मालिकावीर पुरस्कार मिळवण्याबद्दल केला नव्हता विचार”
टी20 मालिकेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे पंड्याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. मालिकावीर पुरस्कार जिंकल्याबद्दल मत व्यक्त करताना हार्दिक म्हणाला की, “मी खूप आनंदी आहे. हा पुरस्कार मिळवण्याबद्दल विचारही केला नव्हता. परंतु संघासाठी केलेला हा प्रयत्न होता.”
विजयामुळे झाला आनंद
“दुसर्या वनडे सामन्यानंतर, चार सामन्यांची मालिका आहे, असा आम्ही विचार केला आणि आम्ही तीन सामन्यात विजय मिळवू शकलो. त्यामुळे मला आनंद झाला,” असेही पुढे बोलताना हार्दिक म्हणाला.
नटराजन सामनावीर पुरस्काराचा मानकरी- पंड्या
मालिकावीर पुरस्कार जिंकल्यानंतर पंड्याने ट्वीट केले की, “नटराजन तू या मालिकेत शानदार प्रदर्शन केले. अवघड परिस्थिती असतानाही पदार्पणातच तू उत्कृष्ट प्रदर्शन केले. यावरून तुझी प्रतिभा आणि कठोर परिश्रम लक्षात येते. सामनावीर पुरस्काराचा मानकरी तू आहेस. मालिका विजयाबद्दल अभिनंदन.”
Natarajan, you were outstanding this series. To perform brilliantly in difficult conditions on your India debut speaks volumes of your talent and hardwork 👏 You deserve Man of the Series from my side bhai! Congratulations to #TeamIndia on the win 🇮🇳🏆 pic.twitter.com/gguk4WIlQD
— hardik pandya (@hardikpandya7) December 8, 2020
दुसऱ्या टी20 मध्ये पंड्याने केली महत्वपूर्ण खेळी
हार्दिक पंड्याच्या आक्रमक 42 धावांच्या खेळीमुळे भारतीय संघाने दुसर्या टी20 सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाला 6 गडी राखून पराभूत करत मालिका जिंकली.
पंड्याने तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत एकूण 78 (16, 42*आणि 20) धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
शार्दुलचा राग अनावर! आक्रमक फलंदाज मॅक्सवेलचा झेल सोडताच केला अपशब्दांचा वापर, पाहा Video
‘हम तो उड गए’, पॅरासिलिंग करतानाचा व्हिडिओ केला सचिनने शेअर
धडकी भरवणारा क्षण! कार्तिक त्यागीचा चेंडू लागला पुकोवस्कीच्या डोक्याला, अन् पुढे काय झालं पाहाच…
ट्रेंडिंग लेख-
अरेरे! क्रिकेट जगतावर राज्य करूनही कधीच रणजी ट्रॉफी न जिंकलेले ४ भारतीय दिग्गज
टीम इंडियाचे ३ धडाकेबाज गोलंदाज, ज्यांनी केली २०२० मध्ये वनडेत सर्वोत्तम कामगिरी
टॉप ३: २०२० मध्ये वनडेत सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारे भारतीय शिलेदार; अव्वलस्थानी ‘हा’ खेळाडू