12 मार्चपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ धरमशाला येथे पोहचले असून त्यांनी सरावालाही सुरुवात केली आहे. या मालिकेतील पहिला सामना धरमशाला येथे होणार आहे.
या मालिकेतून अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या जवळजवळ ६ महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. तो सप्टेंबर २०१९ पासून पाठीच्या दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. त्याच्या पाठीवर मागीलवर्षी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण आता तो या दुखापतीतून सावरला असून त्याचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
त्यामुळे तो सध्या भारतीय संघाबरोबर असून जोरदार सराव करत आहे. तो फलंदाजी करताना मोठ्या फटक्यांचा सराव करत असतानाचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये दिसते की पूर्णपणे फिट झालेला हार्दिक मोठे फटके नेट्समध्ये मारत आहे.
THAT sound ????????
WHACKED – courtesy @hardikpandya7 #TeamIndia #INDvsSA pic.twitter.com/YKFTDHRoEU— BCCI (@BCCI) March 10, 2020
हार्दिकने या वनडे मालिकेआधी डीवाय पाटिल टी२० स्पर्धा खेळली आहे. या स्पर्धेत रिलायंस १ संघाकडून खेळताना २ वेळा त्याने तुफानी फटकेबाजी करताना शतके केली आहेत. याच स्पर्धेतून त्याने त्याचा फिटनेसही सिद्ध केला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी हार्दिकबरोबरच भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवन यांचे देखील दुखापतीतून सावरल्यानंतर भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूंनी अशी साजरी केली धुळवड, पहा व्हिडिओ
–आयसीसी महिला विश्वचषक २०२१ चे वेळापत्रक जाहीर
–संपूर्ण वेळापत्रक: अशी होणार आहे भारत-दक्षिण आफ्रिका वनडे मालिका






