12 मार्चपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ धरमशाला येथे पोहचले आहेत. या मालिकेतील पहिला सामना धरमशाला येथे होणार आहे.
आयपीएल २०२० सुरु होण्यापूर्वी ही भारताची शेवटची आंतरराष्ट्रीय मालिका आहे. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने १६ जणांचा संघ भारत दौऱ्यावर पाठवला आहे. त्यांच्या संघात माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसचेही पुनरागमन झाले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी वनडे पदार्पण केलेल्या जानेमन मलानलाही दक्षिण आफ्रिकेने संघात स्थान दिले आहे.
त्याचबरोबर या मालिकेसाठी जाहीर केलेल्या भारतीय संघात भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या आणि शिखर धवन यांचे दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन झाले आहे. मात्र या मालिकेसाठी रोहित शर्माचा संघात समावेश नाही.
या मालिकेदरम्यान दोन्ही संघ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्याचीही काळजी घेताना दिसतील.
या मालिकेतील धरमलाशा येथे पहिला सामना झाल्यानंतर १५ मार्चला लखनऊ येथे दुसरा वनडे सामना होईल. तर तिसरा वनडे सामना १८ मार्चला कोलकाता येथे होणार आहे. हे तिन्ही सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरु होतील.
भारत-दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेसाठी असे आहेत संघ –
भारत – विराट कोहली (कर्णधार), पृथ्वी शॉ, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, शिखर धवन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, केएल राहुल, रिषभ पंंत, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव.
दक्षिण आफ्रिका – क्विंटॉन डी कॉक (कर्णधार आणि यष्टीरक्षक), तेंबा बाऊमा, रस्सी व्हॅन दर दसेन, फाफ डू प्लेसिस, काईल वेरिन, हेन्रीच क्लासेन, डेव्हिड मिलर, जॉन-जॉन स्मट्स, अँडील फेहलुक्वायो, लुंगी एन्गिडी, लुथो सिपाम्ला, ब्यूरान हेन्ड्रिक्स, एन्रीच नोर्जे, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, जानेमन मलान.
#दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा – 2020
12 मार्च – पहिला वनडे – हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धरमशाला (वेळ: दुपारी १.३० वाजता)
15 मार्च – दुसरा वनडे – भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनऊ (वेळ: दुपारी १.३० वाजता)
18 मार्च – तिसरा वनडे – इडन गार्डन, कोलकता (वेळ: दुपारी १.३० वाजता)
महत्त्वाच्या बातम्या –
–ना रोहित, ना कोहली हा आहे ब्रायन लाराचा फेव्हरेट भारतीय खेळाडू
–…तर आशिया इलेव्हन विरुद्ध वर्ल्ड इलेव्हन संघांचे सामने होऊ शकतात रद्द
–खेळाडूला नाही तर चक्क अंपायरला दुखापतीमुळे पडावे लागले सामन्यातून बाहेर