आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताचा थरकाप उडवणाऱ्या हार्दिक पंड्या याने त्याच्या टी-20 क्रमवारीत बरीच प्रगती केली आहे. हार्दिकने 8 स्थानांची झेप घेतली आहे, विशेषत: टी-20 अष्टपैलू क्रमवारीत अव्वल 5 मध्ये पोहोचला आहे. हार्दिक टी-20 अष्टपैलू क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर आला आहे, जी टी-20 क्रमवारीत हार्दिकची सर्वोत्तम रँक आहे. खरे तर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हार्दिकने 17 चेंडूत 33 धावा केल्या, तर दुसरीकडे गोलंदाजी करताना 3 बळी घेतले. हार्दिकला सामनावीराचा किताब देण्यात आला.
Some big movements in the @MRFWorldwide ICC Men's T20I Player Rankings after the first few matches of #AsiaCup2022 📈📉
Details 👇https://t.co/Mu2pzpq5GW
— ICC (@ICC) August 31, 2022
त्याचबरोबर टी-20 अष्टपैलू क्रमवारीत मोहम्मद नबी पहिल्या क्रमांकावर आहे, तर शाकिब दुसऱ्या क्रमांकावर, मोईन अली तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल चौथ्या क्रमांकावर आहे. हार्दिक पांड्या 167 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. यासोबतच ताज्या टी-20 फलंदाजी क्रमवारीत बाबर पहिल्या क्रमांकावर आहे, तर रिझवान दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा सूर्यकुमार यादव तिसऱ्या तर एडन मार्करामला चौथ्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे.
त्याच वेळी, जेव्हा टी-20 बॉलिंग रँकिंगचा विचार केला जातो तेव्हा राशिद खानला दोन स्थानांचा फायदा झाला आहे. रशीद टी-20 गोलंदाजी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. जोस हेझलवूड पहिल्या क्रमांकावर आहे, तर तबरेझ शम्सी दुसऱ्या क्रमांकावर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
धक्कादायक! भारतीय चाहत्याला जीवे मारण्याची धमकी; भारत-पाक सामन्यात केलेली ही कृती
कर्णधार पाकिस्तानी; उपकर्णधार भारतीय! पाहा हाँगकाँगचा प्रत्येक खेळाडू मूळचा कोणत्या देशाचा
‘बाप्पां’च्या भक्तीत तल्लीन झाला डेविड वॉर्नर, खास पोस्टसह जिंकली कोट्यवधी भारतीयांची मने