भारतीय संघातील क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांचा कॉफी विथ करन या शोमधील एपिसोड रविवारी(6 जानेवारी) प्रसारित झाला. या शोमध्ये त्यांनी केलेल्या विवादात्मक विधानांवर मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टिका झाली आहे.
राहुल आणि पंड्या यांना भारतीय क्रिकेट नियमक मंडळाकडूनही(बीसीसीआय) त्यांच्या विधानांबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे. त्याआधी एक तासापूर्वी हार्दिक पंड्याने सोशल मीडियामधून चाहत्यांची माफी मागितली आहे.
राहुल आणि पंड्या यांनी महिलांबद्दल या शोमध्ये काही विवादात्मक विधाने केली होती. त्यामुळे त्यांना चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.
त्यांना बीसीसीआयने पाठवलेल्या नोटीसबद्दल बीसीसीआयसाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमुन दिलेल्या समीतीचे अध्यक्ष विनोद राय यांनी माहिती दिली की, ‘आम्ही हार्दीक पंड्या आणि केएल राहुलला त्यांनी शोमध्ये केलेल्या विधानांबद्दल नोटीस पाठवली आहे. त्यांना स्पष्टीकरण देण्यासाठी 24 तासांचा अवधी देण्यात आला आहे.’
त्याआधी पंड्याने माफी मागताना सोशल मीडियावर म्हटले आहे की ‘ कॉफी विथ करन शोमध्ये मी केलेल्या विधानांमुळे कोणी दुखावले गेले असेल तर मी सर्वांची माफी मागत आहे. मी त्या शोच्या स्वरुपानुसार वाहत गेलो. पण माझा कोणाच्याही भावनांचा आपमान करण्याचा हेतू नव्हता.’
— hardik pandya (@hardikpandya7) January 9, 2019
याबरोबर असे वृत्त आहे की बीसीसीआय क्रिकेटपटूंनी कोणत्याही क्रिकेट विषयाच्या व्यतिरिक्त असलेल्या शोमध्ये जाण्याबद्दल कठोर पावले उचलण्याची शक्यता आहे.
याबरोबरच मागील काही महिन्यांपासून राहुल खराब फॉर्ममध्ये असल्यानेही त्याच्यावर टीका होत आहे. तसेच हार्दिकने दुखापतीतून सावरल्यानंतर पुन्हा भारतीय संघात पुनरागमन केले आहे. परंतू अजून त्याने दुखापतीनंतर भारतीय संघाकडून सामना खेळलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
–पहा कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने घेतले आहे किती शिक्षण ?
–विश्वचषक विजेता शुबमन गिल स्टार आहे, लवकरच येणार टीम इंडियात
–११५ धावा करूनही या खेळाडूचे हुकले शतक, जाणून घ्या कसे